इच्छुकांचीची मुलाखती घेणाऱ्यांमध्ये हजेरी; इच्छुक उमेदवारांनी नोंदविला आक्षेप

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली असतानाही मंगळवारी जिल्ह्यातून इच्छुक असलेल्या काँग्रेस नेत्यांनीच मुलखात घेण्यासाठी हजेरी लावली. त्यामुळे मुलाखती देणाऱ्या इच्छुकांनी त्यावर आक्षेप घेतला. मुलाखती देणाऱ्यांमध्ये सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते.
इच्छुकांचीची मुलाखती घेणाऱ्यांमध्ये हजेरी; इच्छुक उमेदवारांनी नोंदविला आक्षेप

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली असतानाही मंगळवारी जिल्ह्यातून इच्छुक असलेल्या काँग्रेस नेत्यांनीच मुलखात घेण्यासाठी हजेरी लावली. त्यामुळे मुलाखती देणाऱ्या इच्छुकांनी त्यावर आक्षेप घेतला. मुलाखती देणाऱ्यांमध्ये सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते. पाचही विधानसभा मतदारसंघासाठीच्या मुलाखती आटोपल्या असून, पक्ष निरीक्षक त्यांचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सोपविणार आहे.  

स्वराज्य भवन येथे काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून आमदार राहुल बोंद्रे व  राहुल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत सभागृहात मुलाखत घेताना महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आमदार नातिकाेउद्दिन खतीब, ज्ञानदेव ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, प्रदेश महासचिव मदन भरगड, बाबाराव विखे पाटील, साधना गावंडे, रामदास बोडखे, डाॅ. सुभाष कोरपे,  विजय शर्मा, साजिद खान पठाण, पुष्पा  देशमुख, महेश गणगणे, अंशुमन देशमुख, कपिल रावदेव, दादाराव मते पाटील, देवेश पातोडे आदींची उपस्थित होती. मुलाखतीला येताना शक्ती प्रदर्शन न करण्याचे इच्छुक उमेदवारांना सांगण्यात आले होते. त्यानंतरही काही इच्छुकांनी निवडक कार्यकर्त्यांसह स्वराज्य भवनात हजेरी लावून मुलाखत दिली. 

मूर्जिजापूरसाठी इच्छुकांची वानवा
मूर्तिजापूर मतदारसंघासाठी  मोजच्या इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यात आशीष बरे, ब्रम्हदेव इंगळे, भूषण गायकवाड, देवीदास कांबळे व महेंद्र गवई यांचाच समावेश आहे. 

बाळापूरसाठी गर्दी
बाळापूर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागणाऱ्यांची गर्दी झाली आहे. यात प्रकाश तायडे, डाॅ. रफिक शेख, चंद्रशेखर चिंचोळकर, श्रीकृष्णा अंधारे, ऐनोकोद्दिन खतीब, राजेश गावंडे, वामनराव देशमुख, डॉ. सुधीर ढोणे, अजहर इकबाल, सतिष पवार, पंढरी हाडोळे, अजय ताथोड, विजय शर्मा, प्रतिक जैन, रामसिंग जाधव आदींचा समावेश आहे.

पश्चिमसाठी इच्छुकांमध्ये तरुणांचा भरणा
अकोला पश्चिम मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावेदारी केली जात असतानाही काँग्रेसकडून उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी यादी असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. मंगळवारी डॉ. झिशान हुसेन, विभा राऊत, साजिद खान पठाण, मदन भरगड, अविनाश देशमुख, रमाकांत खेतान, मो. नौशाद, सुरेश पाटील, आझाद खान, जब्बार रेहान, बबनराव चौधरी, आकाश कवडे, चंदू सावजी, प्रदीप वाखारीया आदींनी मुलाखती दिल्या. 

अकोला पूर्व काँग्रेस नेत्यांना नकोसा 
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अकोला पूर्व मतदारसंघातून एकानेच उमेदवारी मागितली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनाही हा मतदारसंघ नकोसा असल्याचे दिसून येते. त्यामुळे मंगळवारी या मतदारसंघातून मुलाखतीकडे दिग्गज नेत्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दादाराव मते पाटील यांच्यासह अजाबराव टाले, विवेक पारसकर आणि गजानन आखरे यांनीच मुलाखती दिल्या. 
 
अकोटसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दावा
नुकतेच निवृत्त झालेले माजी महसूल अधिकारी अशोक अमानकर यांनीही अकोट मतदारसंघासाठी काँग्रेसकडे दावा केला आहे.  सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महेश गणगणे या मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे यावेळी काँग्रेसला या मतदारसंघाकडून अपेक्षा आहे. विशेषतः मराठा समाजातील नेत्यांना अकोट मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असल्याने त्यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यात डॉ. संजिवनी बिहाडे, महेश गणगणे, बाळकृष्ण बोंद्रे, डाॅ. प्रमोद चोरे, अशोक अमानकर, प्रशांत पाचडे, संजय बोडखे, निनाद मानकर, शोयेब अली मिरसाहेब, रमेश म्हैसने, डॉ. पुरुषोत्तम दातकर, शामशिल भोपळे, मनिषा भांबुरकर यांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com