शिवसेनेला उत्तर देण्यासाठी भाजप आमदार जिल्हा अध्यक्ष 

  शिवसेनेला उत्तर देण्यासाठी भाजप आमदार जिल्हा अध्यक्ष 

अकोला : जिल्ह्यात शिवसेनेला उत्तर देण्यासाठी भाजपने पक्षाला मोठी रसद पुरवू शकणारे आक्रमक नेते महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले आहे. भाजप जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण)आमदार रणधीर सावरकर यांची, तर महानगराध्यक्षपदी माजी महापौर विजय अग्रवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

ही निवड प्रक्रिया बुधवारी भाजप पक्ष कार्यालयात पार पडली. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या याप्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रदेश प्रवक्ता आमदार गिरीश व्यास यांनी कामकाज पाहिले.

यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, तेजराव थोरात, किशोर पाटील यांची उपस्थिती होती. रणधीर सावरकर हे तेजराव थोरात यांच्याकडून तर विजय अग्रवाल हे किशोर मांगटे पाटील यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. 

नवनिर्वाचित तालुका, शहर अध्यक्षांचा सत्कार बुधवारी करण्यात आला. यात पातूरचे तालुकाध्यक्ष रमण जैन, अकोल्याचे अंबादास उमाळे, बाळापूर ग्रामीणचे अमोल साबळे, शहरचे महेंद्रसिंग पेजवार, तेल्हाऱ्याचे गजानन उंबरकर, अकोट ग्रामीणचे अशोकराव गावंडे, मूर्तिजापूर ग्रामीणचे भूषण कोकाटे, शहरचे रितेष सबाजकर आणि बार्शीटाकळीचे महादेवराव काकड यांचा समावेश होता. 

जिल्ह्यात शिवसेनेला उत्तर देण्यासाठी भाजपने पक्षाला मोठी रसद पुरवू शकणारे आक्रमक नेते महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले आहे. येत्या दोन वर्षात महापालिका निवडणूक होऊ घातली आहे. त्यासोबत महाविकास आघाडीचे सरकार कोणत्या क्षणी कोसळेल याचा नेम नाही.

त्यामुळे भाजपने पक्ष संघटना अलर्ट असावी आणि कोणत्याही क्षणी निवडणुकीला सामोरे जाता यावे यादृष्टिकोनातून आमदार सावरकर आणि माजी महापौर अग्रवाल यांची नियुक्ती केली. या दोन्ही नेत्यांची पक्षावर मजबूत पकड आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com