Akola BJP politics | Sarkarnama

भाजप आमदार पारदर्शक कारभारासाठी आक्रमक 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 मार्च 2017

राज्यात पारदर्शक कारभारावर भर देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही आपल्या मतदारसंघात पारदर्शक कारभाराचा आग्रह धरला आहे. अकोला पंचायत समितीच्या आमसभेत मागील सभेचे इतिवृत्त सादर न करताच आमसभा घेणाऱ्या बीडीओंची कानउघाडणी करत आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांना पारदर्शकच कारभार करा, मी जिल्ह्यातील मुख्य अधिकाऱ्यांनाही दणका द्यायला मागे पुढे पाहत नाही, असा सज्जड दम देत आमदार सावरकर यांनी ही सभा तहकूब केली. 

अकोला : राज्यात पारदर्शक कारभारावर भर देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही आपल्या मतदारसंघात पारदर्शक कारभाराचा आग्रह धरला आहे. अकोला पंचायत समितीच्या आमसभेत मागील सभेचे इतिवृत्त सादर न करताच आमसभा घेणाऱ्या बीडीओंची कानउघाडणी करत आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांना पारदर्शकच कारभार करा, मी जिल्ह्यातील मुख्य अधिकाऱ्यांनाही दणका द्यायला मागे पुढे पाहत नाही, असा सज्जड दम देत आमदार सावरकर यांनी ही सभा तहकूब केली. 

अकोला पंचायत समितीची आमसभा व सरपंच शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रणधीर सावरकर होते. व्यासपीठावर प्रामुख्याने सभापती अरुण परोडकर, उपसभापती गणेश अंधारे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आणि तालुक्‍यातील सरपंच उपस्थित होते. आमसभेत प्रशासकीय अहवालाचे वाचन करण्यात आले. मात्र, मागील आमसभेचे इतिवृत्त सादर करण्यात न आल्याने आमदार सावरकर यांचा पारा चढला. आमसभेचे इतिवृत्त न देता सभेचे नियमबाह्य काम कसे करता, असा प्रश्न उपस्थित करीत आमदार सावरकर यांनी गटविकास अधिकारी गजानन वेले यांना धारेवर धरले.

आमसभेबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गंभीर नसल्याचे ताशेरे त्यांनी ओढले. अधिकारी केवळ वेळ मारून नेण्याचे काम करीत असून ही गंभीर बाब आहे. माझ्या मतदारसंघात पारदर्शक कामे करा. मी जिल्ह्यातील मुख्य अधिकाऱ्यांनाही दणका द्यायला मागे पुढे पाहत नाही, तर तुमची खैर नाही, असा सज्जड दम आमदारांनी अधिकाऱ्यांना देत ही सभा दहा एप्रिलनंतर घेण्याचे निर्देश दिले. आमदार सावरकर यांच्या आक्रमक पवित्र्याने तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख