अन् अंजलीताई झाल्या बाळासाहेब अांबेडकरांच्या प्रेक्षक - Akola Anjali Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

अन् अंजलीताई झाल्या बाळासाहेब अांबेडकरांच्या प्रेक्षक

श्रीकांत पाचकवडे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

हजाराेंचा जनसमुदाय...व्यासपीठावर लाेकप्रतिनिधींची गर्दी अाणि बाळासाहेब अांबेडकर अापल्या तडाखेबाज वकृत्वाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत अाहेत. या हजाराेंच्या जनसमुदायात महिलांच्या रांगेत बसलेल्या अंजलीताई अांबेडकर यांचा साधेपणा अनेकांना अाश्चर्याचा धक्का देणाराच ठरला.

अकाेला : हजाराेंचा जनसमुदाय...व्यासपीठावर लाेकप्रतिनिधींची गर्दी अाणि बाळासाहेब अांबेडकर अापल्या तडाखेबाज वकृत्वाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत अाहेत. या हजाराेंच्या जनसमुदायात महिलांच्या रांगेत बसलेल्या अंजलीताई अांबेडकर यांचा साधेपणा अनेकांना अाश्चर्याचा धक्का देणाराच ठरला.

देशाच्या राजकीय पटलावर सध्या घराणेशाहीला ऊत अाला अाहे. पत्नी, मुलं, सुना इतकचं काय तर नातवंडांचेही राजकीय भविष्य सुकर करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची धडपड असते. मात्र, घराणेशाहीच्या या परपंरेला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब अांबेडकर यांचे कुटूंब अपवाद ठरले अाहे. राजकारणांमध्ये यशाची उत्तंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या नेत्यांचे नाव हाेते. मात्र या नेत्यांना माेठे करणारे जे अनेक घटक असतात, त्यामध्ये सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे त्यांची साैभाग्यवती. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अापली वेगळी अाेळख निर्माण करणारे बाळासाहेब अांबेडकरांच्या राजकीय जिवनात सुद्धा अंजलीताई अांबेडकर यांची भक्कम साथ मिळाली. मात्र, त्या कधीही राजकीय पद न स्विकारता सामाजीक चळवळीत कार्यकर्त्या म्हणून सक्रीय राहत अाहेत.

टाटा इन्स्टिट्युट अाॅफ साेशल सायन्स मुंबई येथून समाजकार्याची पदवी घेतलेल्या अंजलीताई पुण्यातील कर्वे इन्टिट्युटमध्ये प्राध्यापिका अाहेत. भारिपच्या स्थापनेपासूनच त्या सक्रीयपणे चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून काम करीत अाहेत. फुले, शाहु, अांबेडकरी चळवळी, स्त्री विषयक चळवळीचा गाडा अभ्यासक असलेल्या अंजलीताईंनी स्त्रीयांचे प्रश्न, त्यांच्या न्याय हक्कासाठी अविरत कार्य करीत अाहेत.

अकाेल्यात झालेल्या अाेबीसी मेळाव्यात व्यासपीठावर अाजी-माजी अामदार, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठ भरले असताना अंजलीताई अांबेडकर यांना अायाेजकांनी व्यासपीठावर येण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी व्यासपीठावर न जाता सर्वसामान्य कार्यकर्त्या प्रमाणे महिलांच्या रांगेत बसूनच बाळासाहेबांचे विचार प्रेक्षक म्हणून एेकले. त्यांचा हा साधेपणा उपस्थित जनसुमदायास सुखद धक्का देणाराच ठरला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख