Akola Addl SP Vijaykant Sagar | Sarkarnama

अपर पाेलिस अधिक्षक विजयकांत सागर देतात युवकांना स्पर्धा परिक्षेचे धडे 

सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

प्रशासकीय सेवेत विदर्भाचा टक्का वाढविण्यासाठी अकाेल्याचे अपर पाेलिस अधिक्षक विजयकांत सागर यांनी पुढाकार घेतला अाहे. शाळा, महाविद्यालयात जात युवाशक्तीला स्पर्धा परिषदेचे धडे देऊन देशाचे उज्वल भविष्य असलेल्या युवावर्गाला सकारात्मक मार्गाने लावण्याचा प्रयत्न विजयकांत सागर करीत असल्याने हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरला अाहे. 

अकाेला : प्रशासकीय सेवेत विदर्भाचा टक्का वाढविण्यासाठी अकाेल्याचे अपर पाेलिस अधिक्षक विजयकांत सागर यांनी पुढाकार घेतला अाहे. शाळा, महाविद्यालयात जात युवाशक्तीला स्पर्धा परिषदेचे धडे देऊन देशाचे उज्वल भविष्य असलेल्या युवावर्गाला सकारात्मक मार्गाने लावण्याचा प्रयत्न विजयकांत सागर करीत असल्याने हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरला अाहे. 

चित्रपटांमध्ये पाेलिसांची नेहमीच 'बॅड इमेज' दाखविली जाते. मात्र, महाराष्ट्र पाेलिस सेवेत अनेक चांगल्या अधिकाऱ्यांनी अापल्या कार्य तत्परतेने पाेलिस प्रशासनाची 'बॅड' दाखविली जाणारी इमेज 'गुड' करण्याचा प्रयत्न केला अाहे. अकाेल्याचे अपर पाेलिस अधिक्षक विजयकांत सागर यांनी जिल्ह्यात अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून समाजात पाेलिसांची सकारात्मक इमेज बनविण्याचा प्रयत्न केला अाहे.

अाजच्या स्पर्धेच्या युगात युवावर्गाचा सर्वांधिक कल स्पर्धा परिक्षेकडे अाहे. युपीएससी, एमपीएससी अादी स्पर्धा परिक्षेची तयारी युवक करीत अाहेत. मात्र, शिकवणी शिकवल्या जाणारे ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांकडून मिळाले तर त्यांचा निश्चितच युवकांना फायदा हाेताे. ही बाब हेरून विजयकांत सागर यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींचे मार्गदर्शन वर्ग घेत अाहेत. ग्रामीण भागातील अनेक गुणवंत विद्यार्थी याेग्य मार्गदर्शनाअभावी मागे पडू नये म्हणुन सागर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण पाेलिस ठाण्यात सुद्धा मार्गदर्शन वर्ग सुरू केले असून अनेक युवक पाेलिस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांकडून परिक्षेचा अभ्यास, तयारी कशी करावी याची माहिती घेत अाहेत. 

जिल्ह्यात मुर्तिजापूर, उरळ, माना पाेलिस ठाण्यासह इतर ठाण्यातही विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा, पाेलिस भरतीचे लेखी व शारिरीक चाचणीची तयारी करून घेण्यात येत अाहे. विशेष म्हणजे युवावर्गाला माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे, साेशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करण्यासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात येत अाहे. शहरी व ग्रामीण भागातील युवावर्गासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे देशाचे उज्वल भविष्य असलेली युवाशक्तीची वाटचाल सकारात्मक दिशेने हाेत अाहे. 

उच्च ध्येय ठेवावे
शहरी, ग्रामीण भागातील युवावर्ग स्पर्धा परिक्षेसंदर्भात खुप उत्साही अाहे. मात्र, त्यांना याेग्य मार्गदर्शन न मिळाल्यास त्यांच्या शैक्षणिक भविष्याची दिशा भरकटली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना याेग्य मार्गदर्शन करून देशाचे उज्वल भविष्य घडविण्याचा हा प्रयत्न करीत अाहे. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेऊन अभ्यासाचे याेग्य नियाेजन करून तयारी केल्यास यश निश्चितच मिळेल.
-विजयकांत सागर, अपर जिल्हा पाेलिस अधिक्षक 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख