अकलुज दुसऱ्या दिवशीही बंदच 

पंढरपूर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यावर दगडफेक झाल्याच्या घटनेचे पडसाद आज येथे उमटले. या घटनेचा निषेध नोंदवत आज येथील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
अकलुज दुसऱ्या दिवशीही बंदच 

अकलुज : पंढरपूर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यावर दगडफेक झाल्याच्या घटनेचे पडसाद आज येथे उमटले. या घटनेचा निषेध नोंदवत आज येथील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. 

युवकांनी शहरात फिरुन दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी अवाहन केले. त्यामुळे शहरातील बाजारपेठ आज सलग दुसऱ्या दिवशी बंद होती. या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात शांतता कमिटीची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्या ज्योतीदेवी मानेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, शशिकला भरते, तात्या गुळवे, राहुल जगताप, विठ्ठल गायकवाड, उत्कर्ष शेटे, तात्या सोनवणे, खंडागळे, ऍड. वजीर शेख, बाळासाहेब सणस उपस्थित होते. शांतता कमिटीच्या बैठकीत पंढरपूर येथील घटनेचा निषेध करण्यात आला. गुरुवारी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या निमित्ताने शहर बंद होते. त्यानंतर शुक्रवारी देखील बंद पुकारल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com