अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी शर्यतीतून बाहेर

सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट मतदारसंघातील भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार आहेत. भाजपने ही जागा सदाभाऊ खोत यांच्या रयत संघटनेला दिली होती.
 akkalkot mla sachin kalyanshetty
akkalkot mla sachin kalyanshetty

सोलापूर : भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड आठवडाभरात होण्याची शक्‍यता आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या चर्चेत जरी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव असले तरी त्यांनी पक्षाकडे हे पद न देण्याची विनंती केली आहे.  

जिल्हाध्यक्ष पदाबाबत आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, जिल्हाध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा होती. पण, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून माझ्याकडे ती जबाबदारी देऊ नका असे त्यांना सांगितले आहे. मी नवखा आमदार आहे. त्यामुळे मला माझ्या मतदारसंघात वेळ द्यायचा आहे. लोकांच्या अपेक्षा खूप आहेत, त्या पूर्ण करणे आवश्‍यक असल्याबाबत मी पाटील यांना सांगितले आहे.

जिल्हा परिषदेच्या पक्षनेतेपदाच्या विषयावर बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, हे पद जरी असंवैधानिक असले तरी प्रथा-परंपरेनुसार ते चालत आले आहे. पहिल्या अडीच वर्षासाठी आनंद तानवडे यांना पक्षनेते करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी पत्र दिले होते. त्यावेळी पवार यांचे पत्र चालले. मात्र, आताच्या निवडणुकीत त्यांचे पत्र चालत नसल्याचे सांगितले गेले. हे योग्य आहे का? बाराचारे यांना पक्षनेतेपद मिळावे यासाठी आपण प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह धरला. ते माझ्या मतदारसंघातील आहेत. त्याचबरोबर आजपर्यंत त्यांनी पक्षाचे काम चांगले केल्यामुळे त्यांच्या नावासाठी आग्रह धरला. प्रदेशाध्यक्षांकडे याबाबत झालेल्या बैठकीत आमदार राजेंद्र राऊत यांनीही मदन दराडे यांच्यासाठी या पदाची मागणी केली. त्यावेळी उर्वरित सव्वा वर्षासाठी दराडे यांना पक्षनेते करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचेही त्यांनी सांगितले.
 
डोंगरे यांना केला चारवेळा फोन
जिल्हा परिषदेत असमान निधी वितरणाविषयी ते म्हणाले, याविषयी बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांना चारवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाविलाजाने ग्रामविकासमंत्र्यांकडे जावे लागले. पण, ग्रामविकास विभागाच्या पत्राचा वेगळा अर्थ काढून आनंद तानवडे व मल्लिकार्जुन पाटील हे राजकारण करत आहेत. खरे तर आपल्या तालुक्‍याला निधी कमी मिळाला म्हणून त्यांनी भांडायला हवे होते. पण, तसे झाले नाही ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com