akhilish yadav says allince for loksabha election | Sarkarnama

विरोधी पक्षांची महाआघाडी निश्‍चित : अखिलेश 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

लखनौ : 2019 च्या निवडणुकीत विरोधी पक्षांची महाआघाडी निश्‍चित असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागा जिंकण्याच्या दाव्याची अखिलेश यादव यांनी खिल्ली उडवली असून, महाआघाडीच्या नुसत्या तयारीने भयभीत झालेल्या भाजप आघाडीने हे स्वप्न विसरून जावे, असे म्हटले आहे.

 महाआघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, की माध्यमात आघाडीबाबत जोरात चर्चा सुरू आहे. महाआघाडी जवळपास निश्‍चित आहे. उत्तर प्रदेशचा विचार करायचा झाल्यास आघाडी यूपीतही होईल. जे भाजपने चोरले होते, तेच आम्ही चोरले असून, आता आम्ही तोच डाव खेळत आहोत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख