'सप'च्या अध्यक्षपदी   अखिलेश यादव  यांची फेरनिवड 

akhilesh-yadav
akhilesh-yadav

आग्रा    : समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी आज पुन्हा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आता पुढील पाच वर्षे पक्षाची धुरा अखिलेश यांच्याकडे राहील.

येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी याची घोषणा केली. पक्षाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीनवरून पाच वर्षे करण्यासाठी पक्षाच्या मूळ घटनेमध्येच बदल करण्यात आला.  आता समाजवादी पक्ष अखिलेश यांच्या नेतृत्वाखालीच 2019 मधील लोकसभा आणि 2022 मधील विधानसभेची निवडणूक लढणार आहे.

समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळही पाच वर्षे करण्यात आला असून नरेश उत्तम यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीस अपेक्षेप्रमाणे मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यांनी दांडी मारली. अखिलेश यांनी काही दिवसांपूर्वी मुलायमसिंह यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीस डिम्पल यादव, जया बच्चन, आझम खान, किरणमय नंद आणि नरेश अग्रवाल यांच्यासह देशभरातील पंधरा हजार प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने अखिलेश यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले काका शिवपाल यादव यांना योग्य तो संदेश दिल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com