akhilesh yadav | Sarkarnama

ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपरवर अधिक विश्वास : अखिलेश

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

लखनौ : योगी आदित्यनाथ यांचे उत्तरप्रदेशातील सरकार जनतेची फसवणूक करून सत्तेवर आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज केला. भाजपच्या खोटारडेपणाविरुद्ध कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करण्याची तयारी आहे. ईव्हीएमच्या तुलनेत बॅलेट पेपरवर शंभर टक्के विश्‍वास आहे असेही ते म्हणाले. 

तत्पूर्वी शुक्रवारी बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत भाजपविरोधी गटाशी हातमिळवणी करण्याचे सूतोवाच केले होते. आता अखिलेश यादव यांनी भाजपविरोधात आघाडी करण्याचे आवाहन केले आहे. येथे पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले,"" भाजपने जात आणि धर्माच्या नावावर मतदारांची विभागणी केली आणि खोटे आश्‍वासने देऊन सत्ता मिळवली. हे सरकार जनतेचा विश्‍वासघात करून आले आहे. भाजपच्या या खोटारडापणाविरुद्ध मार्ग काढण्याची गरज आहे. यासाठी विरोधी पक्षात आघाडी असणे गरजेचे आहे. या आघाडीत समाजवादी पक्षाची भूमिका महत्त्वाची असेल.''  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख