आमदार आकाश फुंडकर यांची विधिमंडळ प्रतोद म्हणून निवड 

दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भाजप विधिमंडळ प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार आकाश फुंडकर यांची विधिमंडळ प्रतोद म्हणून निवड 

खामगाव : दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भाजप विधिमंडळ प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानमंडळामध्ये भाजपच्या वतीने कोणत्याही विषयात सरकारची बाजू मांडणे, भाजपच्या सर्व आमदारांना व्हीप जारी करणे, सरकारची बाजू अधिकृतपणे मिडिया व इतर माध्यमांसमोर मांडणे आदी महत्त्वाचे अधिकार आमदार आकाश फुंडकर यांना मिळणार आहेत. 

महाराष्ट्र भाजपत `टीम देवेंद्र फडणवीस'मध्ये युवा आमदार म्हणून आकाश फुंडकर हे एक नाव आहे. त्यांचे वडील कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांचे एक वर्ष आधी निधन झाले. फुंडकर हे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या फळीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्यानंतर आता आमदार ऍड. आकाश फुंडकर हे राजकीय वारसा चालवित आहे. 

दरम्यान आकाश फुंडकर यांची विधिमंडळ प्रतोद पदी निवड करण्यात आली. सत्ताधारी पक्षाचे मुख्य प्रतोद यांना राज्य मंत्र्यांचा दर्जा असतो. त्यामुळे आमदार आकाश फुंडकर याची निवड महत्त्वाची मानल्या जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com