आजचा वाढदिवस : आकाश पांडुरंग फुंडकर, आमदार - खामगाव (बुलडाणा), भाजप  - Akash Fundkar birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : आकाश पांडुरंग फुंडकर, आमदार - खामगाव (बुलडाणा), भाजप 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

बालपणापासून वडिलांकडून समाजकारण व राजकारणाचे धडे आत्मसात करून खामगाव मतदारसंघाची वाटचाल विकास पर्वाकडे नेण्याचे कार्य भाजपचे युवा आमदार आकाश फुंडकर करीत आहेत. 

बालपणापासून वडिलांकडून समाजकारण व राजकारणाचे धडे आत्मसात करून खामगाव मतदारसंघाची वाटचाल विकास पर्वाकडे नेण्याचे कार्य भाजपचे युवा आमदार आकाश फुंडकर करीत आहेत. 

आमदार म्हणून आकाश फुंडकर यांची ही पहिली टर्म असली तरी त्यांची आजवरची वाटचाल ही राजकारणात नव्याने दाखल होणाऱ्या युवाशक्तीसाठी प्रेरणादायीच आहे. 

वडील राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या तालमीत समाजकारण व राजकारणाचे धडे त्यांनी आत्मसात केले. आकाश फुंडकर हे फडणवीस सरकारमध्ये युवा चेहरा आहेत. 

पुणे येथे विधी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. गेल्या तीन वर्षात त्यांची मतदारसंघातील कामगिरी दमदार राहिली असून जलयुक्त शिवार, सिंचन यात त्यांनी मोठी कामे केली आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख