अजितदादांच्या चारही बंडखोऱ्या अयशस्वी

...
अजितदादांच्या चारही बंडखोऱ्या अयशस्वी

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चौथे बंडही अयशस्वी ठरले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे स्वतंत्रपणे नेतृत्त्व करण्याचा त्यांचा प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरला. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आपल्याला डावलले जात असल्याची त्यांची भावना वारंवार उफाळून येत होती. त्यातून ते राजीनाम्याचे अस्त्र उगारून पक्षानेतृत्त्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची समजूत काढून त्यांना राष्ट्रवादीतच ठेवले.

अजितदादांनी तीन दिवसांपूर्वी अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन अनेकांना धक्का दिला होता. हा धक्का त्यांच्या पक्षासाठी मोठा होता. त्या आधी त्यांना विधानसभा निवडणुकीच्या आधी असाच बारामतीच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्यामुळे आपल्याला वारंवार लक्ष्य केले जात असल्याचा त्यांना आक्षेप होता. त्यातून त्यांनी राजीनामा दिला. शरद पवार यांनी इडीच्या विरोधात ज्या दिवशी एल्गार पुकारला त्याच दिवशी अजितदादांनी राजीनामा घेतल्याने त्यांची ती पक्षाच्या विरोधात नाराजी असल्याचे बोलले जात होते.

त्या आधी उपमुख्यमंत्री असताना 2012 मध्ये जलसंपदा खात्यावरी आरोपांमुळे नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. सहा महिने ते सत्तेपासून दूर होते. आपल्या राजीनाम्याच्या वेळी पक्षातील आमदार आपल्याला साथ देतील, अशी त्यांची अपेक्षा तेव्हा फोल ठरली. त्या आधी 2009 मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस हा आपला पक्ष काॅंग्रेसशी वाटाघाटी करताना मुख्यमंत्रिपद मागत नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत जवळपास आठवडाभर `बेपत्ता` झाले होते. तेव्हाही त्यांची नाराजी दूर करत पक्षाने त्यांना सोबत ठेवले. अशा प्रकार दादांची चार बंडखोऱ्या राष्ट्रवादीने पचवून टाकल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com