केमिकल इंजिनिअर रुपालीने टाकले चहाचे दुकान : अजितदादांनीही थोपटली पाठ

नोकरीपेक्षा व्यवसायाच्या वाटेवर रुपालीने प्रवास सुरू केला..
engineer rupali tea stall
engineer rupali tea stall

नाशिक : सायखेडा (निफाड) गावाला एक नवी ओळख मिळाली आहे. ती आहे अभियंता रुपाली शिंदेचा तंदूर अन्‌ बासुंदी चहाची. गेल्या दिड वर्षात या चहाची किर्ती परिसरात सर्वदूर पसरल्याने ही तरुणीने उद्यमशीलतेचा एक नवा मार्ग तयार केला आहे. त्याची वाटचाल एक ब्रॅंडकडे सुरु आहे.

इंजिनिअर होऊन आठ- दहा हजारांची नोकरी करीत रडणारे हजारो आहेत. मात्र डिस्टींक्‍शनसह इंजिनिअरींगची पदवी घेतलेल्या रुपाली शिंदे या हजारोंत एक ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह असंख्य नेत्यांनी रुपालीच्या तंदूरी चहाची चव चाखली अन्‌ त्याला पसंतीही दिली आहे.

सायखेडा येथील बाळासाहेब शिंदे या शेतकरी कुटुंबातील रुपाली अभ्यासात हुशार होतीच. या बळावर तीने चिंचोली (सिन्नर) येथील सर विश्‍वेश्‍वरय्या इन्स्टिट्यूटमधून केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवला. हा अभ्यासक्रम तीने पहिल्याच प्रयत्नांत डिस्टींक्‍शनमध्ये पूर्ण केला. खरी अडचण त्यानंतरच सुरु झाली. नोकरी मिळेना. पदवी असल्याने तीचे करायचे काय? ही नवी अडचण होती. मग तीने काही वेळ ब्युटी पार्लर सुरु केला. मात्र त्यात अपेक्षीत यश आले नाही. त्यानंतर तीने गावात वेगळ्या धाटनीचे चहाचे दुकान सुरु करण्याचे ठरवले.

तिथेच विरोधाची ठिणगी पडली. कुटुंबाचा विरोध होता तसेच नातेवाईकांनी शेरेबाजी सुरु केली. मात्र या विरोधाला न जुमानता रुपालीने अल्पशः पुंजीतून चहाचे दुकान सुरु केले. सामन्य कळकटलेल्या चहापेक्षा तंदूर चहा सुरु केला. बासुंदी हा आणखी एक प्रकार तीने तयार केला व त्यात जम बसविला. पाहता पाहता त्यात तीला यश आले. आता तिच्या भावालाही तीने मदतीला घेत तीन- चार जणांना रोजगार दिला. आता तीचा चहा पंचक्रोशीत नव्हे तर सर्वदूर प्रसिध्दीस आला आहे. नेते या भागात दौऱ्यावर आले तर हमखास येथे चहाला जातात.

सायखेडा येथील अभियंता असलेल्या रूपाली शिंदे हीच्या चहाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. रूपालीने 2015 मध्ये चिंचोली येथील सर विश्‍वेश्‍वरय्या इन्स्टिट्यूटमधून केमिकल इंजिनिअरिंगचे पदवी घेतली. पदवी मिळवूनही कुठेही मनाप्रमाणे नोकरी मिळत नव्हती. खूप प्रयत्न केले पण यश येत नव्हते. यानंतर पुढे स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून हा संकल्प केला. पुरेसा पैसा नसल्याने त्यांनी आई-वडीलांना चहाच्या व्यवसायाविषयी माहिती दिली. त्यानंतर गावातील उपसरपंच धोंडीराम रायते यांनी रूपालीला मोक्‍याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. अभियंताचे शिक्षण पुर्ण केलेल्या रूपाली शिंदे हिने गरीबांसाठी "एक कप माणुसकीचा' हा उपक्रम हाती घेत दिवसभरातून दहा ते पंधरा नागरिकांना मोफत चहाचा लाभ दिला. आज रूपाली गावात एक आदर्श बनली आहे. तीच्या चहाची चव आत्तापर्यंत अनेकांनी चाखली आहे.

उपमुख्यमंञी अजित पवार यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी आमदार दिलीप बनकर यांसह विविध नेत्यांसह तीच्या चहाचा आस्वाद घेतला. तिचा तंदूर चहा कसा तयार होतो हे आवर्जून पाहिले. चहा एव्हढ्याच गोड शब्दात तिचे कौतुक केले. मविप्र संस्थेच्या निलीमाताई पवार, माजी आमदार राजाभाऊ वाजे, यांसह शेकडो नेत्यांनी तीच्या चहाचे कौतुक केले आहे. अभियंता असूनही चहाचा व्यवसाय करत रूपालीच्या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सायखेडा परिसरात रूपालीचा "माऊली चहा कट्टा' चांगलाच प्रसिध्द झाला आहे. चहासाठी तीच्याकडे चांगली रिघ लागलेली असते. रोज साडे पाचशे चहा विक्री होते.

नाशिक शहरात शाखा काढून विस्तार करायचा आहे. माझा स्वतःचा ब्रॅंड निर्माण करुन सर्वदूर व्यवसायाचा नावलौकीक वाढविण्याची इच्छा आहे. शिक्षीतांनी योग्य नोकरी मिळत नसेल तर स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यास जास्त सन्मान व सुबत्ता मिळते. शिक्षणाचा उपयोग उत्तुंग भरारीसाठी केला पाहिजे, असे रुपालीने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com