ajitdada pawar unware about ashok chavan`s claim | Sarkarnama

लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होणार? मला माहितीच नाही : अजित पवार

मिलिंद संगई
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

बारामती शहर : महाराष्ट्राची विधानसभा येत्या 28 फेब्रुवारी रोजी बरखास्त करणार असा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेल्या दाव्याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पानंतर विधानसभा बरखास्तीची घोषणा करण्याची शक्यता अशोक चव्हाण यांनी बोलून दाखविली होती. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होणार असल्याचाही दावा चव्हाण यांनी केला होता.

याबाबत आज सकाळी बारामतीत अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता, आपल्याला या विषयाबाबत काहीच माहिती नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. अधिक विचारले असता आपल्याला हा विषयच माहिती नसल्याचे पुन्हा सांगत याबाबत अधिकचे बोलणे त्यांनी टाळले.

अशोक चव्हाण यांचा दावा खुद्दा मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. अशोकरावांना काहीच काम नसल्याने ते असे भविष्य वर्तवत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी आज लावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख