अजितदादांचे हे पाच समर्थक आमदार गुजरातमध्ये दडवले...

अजितदादांच्या समर्थनार्थ किती आमदार उतरणार, याची उत्सुकता...
ajit pawar and sharad pawar tussle
ajit pawar and sharad pawar tussle

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या दहापैकी पाच आमदार हे भाजपच्या गळाला लागले आहेत. यात नितीन पवार, बाबासाहेब पाटील,
अनिल पाटील,  दौलत दरोडा आणि नरहरी झिरवळ हे गुजरातमध्ये गेल्याचे वृत्त आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलविलेल्या बैठकीला जवळपास 50 आमदारांनी उपस्थिती लावली. धनंजय मुंडे, सुनील शेळके, राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर हे आमदारपण या शपथविधीला उपस्थित होते. मात्र बऱ्याच घडामोडींनंतर ते परत शरद पवार यांच्याकडे परतले. नाशिकचे दिलीप बनकर हे  शपथविधीला हजर होते. मात्र ते मुलावरील उपचारासाठी ते नाशिकला परतले. आपण पक्षासोबत असल्याचे त्यांनी माध्यमांना नंतर सांगितले. मात्र नितीन पवार, बाबासाहेब पाटील, अनिल पाटील, दरोडा आणि झिरवळ यांचा तपास लागला नाही. त्यांना गुजरातमध्ये हलविल्याचे वृत्त आहे.

अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना घेऊन जाण्यासाठी सकाळी एक खासगी विमान तयार होते. हे विमान दिल्लीला जाणार होते. मात्र अनेक आमदार माघारी फिरल्याने तो बेत रद्द करून केवळ पाच आमदारांना गुजरातला नेण्यात आले.

 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई विमानतळावरील सहार हाँटेलमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि  शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी हुडकून काढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात नसलेले आमदार संजय बनसोड यांची माहीती मिलींद नार्वेकर यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली. त्यानंतर पवारांच्या सुचनेनुसार माजी आमदार शशिकांत शिंदे हाँटेल ललित मध्ये आले आणि आमदार संजय बनसोड यांना सोबत घेऊन जाण्यास निघाले. मात्र आमदारांच्या सुरक्षेसाठी स्व:ता शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी संजय बनसोड यांना घेऊन चव्हाण सेंटरमध्ये आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com