..अखेर भाजीपाल्याची गाडी सिंधुताई सपकाळ यांच्या बालसदनात पोचली!

आमची गाडी अडवली तेव्हा काय करावं समजत नव्हतं. मग एका मित्राकडून अजित दादांचा मोबाईल नंबर मागितला. त्याने सुनील मुसळे यांचा नंबर दिला. त्यांना फोन केला आणि आमची अडचण दूर झाली- बाळासाहेब सोळंकुरे
ajit pawars personal assistant helps vegetable providers during lock down 
ajit pawars personal assistant helps vegetable providers during lock down 

पुणे : जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बालसदनला जाणाऱ्या भाजीपाल्याचे वाहन परवाना नसल्याने पोलिसांनी अडवून ठेवले होते. या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी या वाहनासोबत असलेल्या बाळासाहेब सोळंकुरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्विय सहायक सुनील मुसळे यांना फोन केला. त्यांनतर काही वेळातच विशेष बाब म्हणून ही गाडी सोडण्यात आली. 

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय आणि त्यांच्याकडे असणाऱ्या यंत्रणेच्या गतिमानतेची राज्यभर चर्चा आहे.

कुंजीरवाडी येथील भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्यावतीने सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बालसदनाला लॉक डाउनच्या काळात मोफत भाजीपाला देण्याचे ठरवण्यात आले आहे. शशिकांत भोर आणि बाळासाहेब सोळंकुरे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. घेतलेल्या निर्णयानुसार त्यांनी तसे बालसदनाच्या व्यवस्थापकांना कळवले. ते गुरूवारी भाजीपाल्याचे वाहन घेऊन निघाले मात्र त्यांना पोलिसांनी अडवले. 'परवाना असल्याशिवाय जाता येणार नाही,' असे त्यांना सांगण्यात आले. तसेच क्यूआर कोड डाऊनलोड करा, असेही सांगितले. पण अर्धा तास प्रयत्न करूनही कोड डाउन लोड होत नव्हता. मग सोळंकुरे यांनी अजित पवार यांचे स्विय सहाय्य सुनील मुसळे यांना फोन केला. सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. मग मुसळे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना त्या लोकांची अडचण सांगितली. त्यानंतर खास बाब म्हणून त्यांच्या भाजीपाल्याची गाडी सोडण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय लॉक डाउनच्या काळात लोकांना कैफियत मांडण्याचे ठिकाण झाले आहे. कधी अजितदादा फोनवर बोलत आहेत. कधी त्यांचे स्विय सहायक फोन उचलून लोकांना मदत करत आहेत. राज्यातील कोणत्याही भागातून फोन येत आहेत. कोणाची गाडी अडवलेली असते, कोणाला जेवण मिळालेले नसते, कोणाला वाहन मिळालेले नसते, अडचणीत सापडलेली लोक आशेने अजित दादांच्या कार्यालयात फोन करत आहेत आणि तिथून लोकांना आधार मिळत असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com