धावपळीत असतानाही अजित पवारांचा फोन  गेला आणि ... 

..
ajit_pawar Baramati
ajit_pawar Baramati

बारामती शहर :  महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या अत्यंत वेगवान हालचाली सुरु असतानाही अजित पवारांचे  मतदारसंघातीळ लहान मोठ्या घटनेकडे  बारकाईने लक्ष असते याची झलक पाहावयास मिळाली आहे . 

बारामती शहर व परिसरात डेंगीच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत असल्याची बाब माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी तातडीने यंत्रणेला सूचना केल्यानंतर आज 21 डेंगी रुग्णांना पुणे येथे हलविण्यात आले. तसेच रुग्णांवर योग्य उपचार सुरू झाले.

दरम्यान, पवार यांच्या सहकार्याने एकाच दिवसात जवळपास 21 रुग्णांना पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. सध्या अजित पवार दिल्लीमध्ये आहेत. त्यांच्या स्वीय साहयकाने त्यांना बारामतीतील डेंगीच्या रुग्णांच्या गांभीर्याबद्दल माहिती दिली. 

माहिती समजताच पवार यांनी दिल्ली येथूनच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून, बारामतीत जाऊन डेंगी निर्मूलनासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच रुग्णांना पुण्यात योग्य ते उपचार मिळण्यासाठी पवार यांनी संबंधितांना आदेश दिले. त्याचप्रमाणे आरोग्य, नगरपालिका व इतर संबंधितांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com