अजितदादांनीही चिंता व्यक्त केली..पोलिस दिसेल त्याला मारत आहेत..

राज्यात संचारबंदीच्या नावाखाली पोलिस दिसेल त्याला मारत असल्याच्या तक्रारी सरकारकडे गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चिंता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना आणि अत्यावश्यक उत्पादन असलेल्या कारखान्यांना त्रास देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ajit pawar11
ajit pawar11

मुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात मुख्य व उपमुख्य सचिवांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पोलिस संचारबंदीच्या नावाखाली मारत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

आपल्यातील काही लोक बातम्या व अफवांवर विश्वास ठेवून खूप मोठी गर्दी करत आहेत. वास्तविक शेतकऱ्यांचा तयार झालेला माल आणणं व तो ग्राहकापर्यंत पोचवणं, जीवनावश्यक वस्तू पोचवणं यामध्ये सरकार बारकाईने लक्ष देत आहे. परंतु कधी कधी पोलीस विभागातील अधिकारी दिसेल त्याला मारत आहेत. वास्तविक अत्यावश्यक सेवा पुरविणारा जो कर्मचारी आहे, व्यापारी आहे त्यांना त्रास होता कामा नये अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या.

यावेळी श्रीगोंदा येथील व मराठवाडा येथून तक्रारी आल्या आहेत. असं करून सर्वांचेच नुकसान होत आहे. संचारबंदी आहे. गर्दी कमी करायची आहे. १४४ कलम लावण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही. उगाचंच घर सोडायचं नाही. अत्यावश्यक असेल त्यांनीच तेवढया पुरते बाहेर पडून घरात परत यायचं आहे. काळजी घ्यायची ही सरकारची भूमिका आहे मात्र अनेक लोकं पाळण्याचा प्रयत्न करत आहेत. काही सुशिक्षित वर्गच बाहेर पडत आहे. हे थांबलं पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

कोरोनाबाबत जी खाती अहोरात्र काम करत आहेत त्या कर्मचार्‍यांचे चेक पास करून घेतले जात आहेत. किंवा त्यांना आर्थिक अडचण येवू नये याबाबतची माहिती घेतली जात आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.


औषधे व फॅमिली डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे जावू नये. सरकारी दवाखाने आहेत. खाजगी दवाखान्यांनी प्रतिसाद दिला आहे. मेडिकल कॉलेज आहेत तिथे तपासणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय खाजगी दवाखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यात दिवसभरात साधारण दोन हजार लोकांची तपासणी होवू शकते अशी व्यवस्था करण्यात आली आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.


नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये खरेदीसाठी लोकं गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना सूचना करण्यात आल्या आहेत की, गर्दी पाहून दोन - तीन तासातच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याच्या सूचना कराव्यात. सकाळी ८ ते ११ वाजता घरातील एकाने बाहेर पडून खरेदी करावी जेणेकरून गर्दी आटोक्यात आणता येईल. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे ती सर्वांनी द्यावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

काही लोक साठे करून पैसे कमावण्याचा धंदा करत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. अशाप्रकारे कोण चुकीचे वागत असेल तर त्यांना वेळप्रसंगी जेलमध्ये टाकण्यात येईल असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com