ajit pawar withdraws support of two ncp candidates | Sarkarnama

अजित पवारांनी केली राष्ट्रवादीचे `हे दोन` अधिकृत उमेदवार पाडण्याची `व्यवस्था`!

भारत नागणे
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

पंढरपूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात अनेक घडामोडी घडल्या. सोलापूर जिल्हयात मात्र राष्ट्रवादीमध्ये वेगळचा खिस्सा घडला आहे. चक्क राष्ट्रवादीनेच जाहीर केलेल्या दोन उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेण्याची नामूष्की ओढवली आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.

पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांची गोची झाली आहे. करमाळा येथे राष्ट्रवादीने संजय पाटील यांना तर सांगोल्यातून माजी आमदार दीपक साळुंखे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान आज उमेदवारी अर्ज  मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अजित पवार यांनी करमाळा आणि सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या उमेदारांचा राष्ट्रवादी पक्षाशी कोणताही संबंध नाही असे स्पष्ट करत करमाळयातील अपक्ष उमेदवार  संजय पाटील आणि सांगोल्यातील शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांना राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचे जाहीर केले.

त्यामुळे पक्षाच्याच उमेदवारांच्या विरोधात नेत्यांना भूमिका घेण्याची नामुष्की ओढवली आहे. अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्या नंतर करमाळयातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील आणि सांगोल्यातील उमेदवार दीपक साळुंखे यांना विचारले असता त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि उमेदारांची ऐन निवडणूकीत वेगवेगळी भूमिका असल्याने सर्वसामान्य मतदार ही अचंबित झाले. ऐकीकडे ऐन निवडणूकीत राष्ट्रवादी नेत्याचे भाजप सेनेत इनकमिंग सुरू असतानाच पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्याच विरोधात प्रचार करण्याची वेळ राष्ट्रवादी नेत्यांवर आली आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिलेली असताना ही काल  अचानक अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने  पाठिंबा जाहीर करणे हे अजित पवारांचे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांनी दिली आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मी दोन वेळा मतदार संघाचा दौरा पूर्ण केला आहे.सर्वसामान्य जनतेचे प्रेम शरद पवारांवर आहे. त्यामुळे या निवडणूकीत राष्ट्रवादीला यश मिळणार असताना ही अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदाराचा प्रचार न करता अपक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. असे असले तरी मी पूर्ण ताकदीनिशी शरद पवारांच्या विचारा नुसार निवडणूक लढवणार असल्याचे ही संजय पाटील यानी सांगितले.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख