गृह खाते अजित पवारांना नाही तर शिवसेनेला मिळणार

गृह खात्याबद्दलचा अजित पवार यांच्या कथित आग्रहाची दखल न घेता गृहखाते शिवसेनेकडेच राहणार आहे. मात्र, नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विघ्न नको, यासाठी खाते वाटपाची घोषणा सध्या न करता अधिवेशन काळात कोणत्या खात्याची उत्तरे कोण देणार, याचा निर्णय होईल.
Ajit Pawar Will Not Get Home Ministry
Ajit Pawar Will Not Get Home Ministry

मुंबई : गृह खात्याबद्दलचा अजित पवार यांच्या कथित आग्रहाची दखल न घेता गृहखाते शिवसेनेकडेच राहणार आहे. मात्र, नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विघ्न नको, यासाठी खाते वाटपाची घोषणा सध्या न करता अधिवेशन काळात कोणत्या खात्याची उत्तरे कोण देणार, याचा निर्णय होईल.

नगरविकास तसेच ग्रामविकास ही दोन्ही खाती शिवसेनेला मिळतील. अर्थ आणि गृहनिर्माण ही खाती राष्ट्रवादी कॉंग्रेसला, तर महसूल अन्‌ आदिवासी विकासखाते कॉंग्रेसकडे राहतील. कॉंग्रेसला चांगली खाती मिळाली नाहीत, अशी तक्रार करीत एका ज्येष्ठ नेत्याने आमच्या प्रमुखाने वाटाघाटी नीट केल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली.

संभाव्य खातेवाटप
शिवसेना : गृह, नगरविकास, परिवहन, उद्योग, सामाजिक न्याय, पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण.
राष्ट्रवादी कॉंग्रेस : अर्थ आणि नियोजन, गृहनिर्माण, कृषी, सार्वजनिक आरोग्य, सहकार, सार्वजनिक बांधकाम.
कॉंग्रेस : महसूल, ऊर्जा, जलसंपदा, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com