नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावर अजित पवारांचे बारीक लक्ष 

येथील विधान परिषदेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी उद्या (ता.18) आमदार जितेंद्र आव्हाड मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहेत. रविवारी (ता.20) अजित पवार नाशिकला तळ ठोकणार आहेत. यासंदर्भात आज सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. मतदानात दक्षता घेऊन निवडणूक जिंकण्यासाठी झोकून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावर अजित पवारांचे बारीक लक्ष 

नाशिक : येथील विधान परिषदेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी उद्या (ता.18) आमदार जितेंद्र आव्हाड मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहेत. रविवारी (ता.20) अजित पवार नाशिकला तळ ठोकणार आहेत. यासंदर्भात आज सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. मतदानात दक्षता घेऊन निवडणूक जिंकण्यासाठी झोकून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेतला. यासंदर्भात मतदार तसेच उमेदवारांनी केलेल्या कामांची माहिती घेतली. शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पक्षाच्या मतदारांना सहलीला पाठवले आहे. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांच्या सुचना घेतल्यावर त्यांनी सर्व पंधरा तालुक्‍यांत पंधरा निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या निरिक्षकांनी आपल्या तालुक्‍यातील मतदारावंरच लक्ष केंद्रीत करायचे आहे. अन्य ठिकाणी लुडबुड न करता काही मदत करायची असल्याने उमेदवार व पदाधिकाऱ्यांना सूचित करण्याच्या सुचना दिल्या. 

ही निवडणुक पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेने त्यांचे मतदार सहलीला पाठविले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह समविचारी पक्षाचे सदस्य मात्र स्वतः शेवटचे तीन दिवस सहलीला जाणार आहेत. उद्या (ता.18) आमदार जितेंद्र आव्हाड नाशिकला येणार असुन ते दोन दिवस थांबतील. त्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे नाशिकचा दौरा करतील. अजित पवार रविवारी (ता.20) नाशिकला येतील. ते मतदानाच्या दिवशी देखील इथेच थांबणार आहेत. पक्षाचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना मतदान करुन घेण्यासाठी ते स्वतः लक्ष घालतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. आमदार डॉ. अपूर्व हिरे, श्रीराम शेटे, आमदार जयंत पाटील, अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सचिन पिंगळे, प्रेरणा बलकवडे, संदीप गुळवे आदी यावेळी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com