या मंत्रीमंडळातही उपमुख्यमंत्री अजितदादाच; कार्यकर्त्यांची जल्लोषाची तयारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली, तेव्हा अजितदादांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यावरून राष्ट्रवादीतील अजितदादा समर्थक नाराज झाल्याची चर्चा होती. मात्र, अजितदादांनी घडवून आणलेल्या राजकीय नाट्यावर पूर्णपणे पडदा पडेपर्यंत त्यांना मंत्री करायचे नाही, अशी भूमिका पक्ष नेतृत्वाने घेतली होती.
Ajit Pawar will be Deputy Chief Minister in New Cabinet in Maharashtra
Ajit Pawar will be Deputy Chief Minister in New Cabinet in Maharashtra

पुणे : राष्ट्रवादीत बंड करीत भाजपशी सलगी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेले अजित पवार नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या मंत्र्यांच्या नावांच्या यादीत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच्या नावाचा समावेश असून, विधानभवनाच्या आवारातील शाही कार्यक्रमात पवार शपथ घेणार आहेत. 

विशेष म्हणजे, पालकमंत्री असल्याच्या आवेशातच अजितदादांनी पुण्यात शनिवारी बैठक घेतली होती. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे सरकार आणण्याच्या वाटाघाटी या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ करीत असतानाच अजितदादांनी बंड पुकारले आणि भाजपला साथ देत उपमुख्यमंत्री झाले. त्यावरून राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांत प्रचंड खल झाला. अजितदादांच्या पवित्र्यानंतरही भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याचा इरादा पक्का केलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आक्रमकतेपुढे अजितदादांचे बंड शमले. त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय झाले. 

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली, तेव्हा अजितदादांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यावरून राष्ट्रवादीतील अजितदादा समर्थक नाराज झाल्याची चर्चा होती. मात्र, अजितदादांनी घडवून आणलेल्या राजकीय नाट्यावर पूर्णपणे पडदा पडेपर्यंत त्यांना मंत्री करायचे नाही, अशी भूमिका पक्ष नेतृत्वाने घेतली होती. त्यानंतर मात्र; गेल्या काही दिवसांपासून पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे मेळावे घेत अजितदादांनी त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, भाजपसोबत जाण्याची भूमिका गुलदस्त्यातच ठेवली होती. 

परंतु, अजितदादांनी उपमुख्यमंत्री व्हावे, गृह खाते सांभाळावे, पुण्याचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवावे, अशा आग्रही मागण्या त्यांच्या समर्थकांनी लावून धरल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारात अजितदादांना स्थान मिळणार का ?, त्यांच्याकडे कोणते खाते जाणार ? याची उत्सुकता होती. तेव्हा नव्या सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्र्यांच्या नावांची अधिकृत यादी राजभवनातून प्रसिध्द करण्यात आली आहे. दरम्यान, अजितदादा उपमुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट होताच पुण्यातील त्यांच्या समर्थकांनी जल्लोषाची तयार केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com