अजित पवारांना आता हा इतिहास बदलायचाय!

अजित पवारांना आता हा इतिहास बदलायचाय!

मुंबई : राज्यातल्या सत्ता समीकरणासाठी व पुढील गणिते जुळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात प्रथम राज्य पातळीवर चर्चा होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नेत्यांची समिती नेमली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काॅंग्रेसने शिवसेनेशी वाटाघाटी करताना मुख्यमंत्रिपदाचा कालावाधी वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यानंतरच पुढील चर्चा होणार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद घ्यावे, अशी सर्वात पहिली अट असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काॅंग्रेसची राज्यात15 वर्षे सत्ता होती. पण  पक्षाला नेहमीच उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. 2004 मध्ये काॅंग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून येऊन सुद्धा पक्षाला ते पद मिळाले नाही.

आता शिवसेनेशी वाटाघाटी करताना राष्ट्रवादीने याबाबत आग्रह ठेवला आहे. राज्याच्या इतिहासात आतापर्यंत जे उपमुख्यमंत्री राहिले ते परत मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. नाशिकराव तिरपुडे, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार असे आतापर्यंत उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यातील अनेकांकडे मुख्यमंत्री होण्याची क्षमता होती व आहे. मात्र त्यांना उप या पदावरच समाधान मानावे लागले. अजित पवारांना हा इतिहास बदलण्याची संधी आली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काॅंग्रेसने वाटाघाटीत यश मिळविले तर राष्ट्रवादीचा विधीमंडळ नेता म्हणून त्यांची मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागू शकते. 

राज्यात राष्टपती राजवट लागू झाल्यानंतर आता त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक मुंबईत झाली. नुकतीच ही बैठक पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. "बाळासाहेब थोरात जयंत पाटील हे प्रथम चर्चा करतील, कुणी सहभागी व्हावे, समान कार्यक्रम काय असावा, यावर आम्ही चर्चा करणार. मग हायकमांडला याची माहिती देणार आहोत. ही एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मग पुढील निर्णय घेतला जाईल.'' असे अजित पवार यांनी बैठकीच्या सुरूवातीला पत्रकारांना सांगितले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com