अजित पवार संवेदनशील, त्यांचे अश्रू पुन्हा महाराष्ट्राला दिसतील : संजय राऊत 

अजित पवार संवेदनशील, त्यांचे अश्रू पुन्हा महाराष्ट्राला दिसतील : संजय राऊत 

मुंबई :"" राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अश्रू यापूर्वी महाराष्ट्राने पाहिले आहेत. ते संवेदनशील आहे. त्यांचे अश्रू पुन्हा महाराष्ट्राला दिसतील असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले. 

राज्यात सत्तास्थापनेचा पेच काही केल्या संपेना. आज बहुमत सिद्ध करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे आजचे लक्ष उद्यावर गेले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसने आज आपल्याकडे 162 सदस्य असल्याचा दावा करीत राज्यपालांना पत्र दिले आहे. राज्यपाल आज दिल्लीत होते. काही वेळात ते मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर ते पत्र वाचतील. 

आज या सर्व घडामोडी घडत असताना संजय पाटील यांनी भाजपविरोधात सुरू असलेला आपला दांडपट्टा सुरूच ठेवला आहे. ते म्हणाले, "" आज महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथी निमित्त त्यांनी एक आठवण सांगितली. 

त्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले, की अजितदादांची अद्याप मनधरणी का सुरू आहे? त्यावर राऊत म्हणाले, "" हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्‍न आहे. अजितदादा राष्ट्रवादीचे मोठे नेते होते. त्यामुळे त्यांची मनधरणी केली जात असावी. इतके मात्र खरे की ते खूप संवेदशील आहेत. त्यांचे अश्रू महाराष्ट्राने यापूर्वी पाहिले आहेत. त्यांचे अश्रू पुन्हा महाराष्ट्राला दिसतील. दादांवर मोठा दबाव असावा काही तरी कटकारस्थान शिजले असावे असे मला वाटते.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com