फुटाफुटी केली, तर 'सातारा' होतो : अजित पवार 

...लगेच मी नाराज झालो, बैठक रद्द झाली, अशा बातम्या सुरू झाल्या. साहेबांना येऊन बोलावं लागलं. त्यामुळं आता कानाला खडा. 'नो कामेंटस' एवढंच म्हणणार. -अजित पवार
ajit Pawar Udayanraje
ajit Pawar Udayanraje

सोमेश्‍वरनगर : "भाजपचे आमदार फुटणार, असे मी कधीही म्हणालो नाही. अनेकजण प्रथमच निवडून आल्याने ते होणार नाही. शिवाय, फुटाफुटी केल्यावर काय होते, हे सातारा लोकसभेच्या निमित्ताने आपण बघितले," अशा शब्दात माजी उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते अजित पवार यांनी उदयनराजे भोसलेंना त्यांचे नाव न घेता टोला लगावला .

 सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते.  

 अजित पवार पुढे म्हणाले , कर्नाटकात फुटिरांना पुन्हा निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाने आमदार फोडले तर अन्य तीन पक्ष एकत्र येऊन त्या पक्षाच्या आमदाराला पाडणार हे ठरलंय." 

आता कानाला खडा

"आम्हाला चॅनेलवरच कळालं की, आम्ही व कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र दिलंय!  आम्हाला अज्ञात ठिकाणी बसायचं होतं. सोबत काही माणसंही असतात. त्यांना त्रास नको म्हणून चॅनेलवाल्यांना 'मी बारामतीला चाललोय' असं सांगितलं होत ", असे सांगून अजित पवार पुढे म्हणाले , "लगेच मी नाराज झालो, बैठक रद्द झाली, अशा बातम्या सुरू झाल्या. साहेबांना येऊन बोलावं लागलं. त्यामुळं आता कानाला खडा. 'नो कामेंटस' एवढंच म्हणणार."

"लोकांनी पण अशात तथ्य आहे, असं समजू नये. मी बरंच काही  व्हावं, असं तुम्हाला वाटतं; पण त्यासाठी आकडे आणि विचार जुळावे लागतात,'' असेही अजित पवार  म्हणाले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com