अजितदादा म्हणाले, लक्ष्मण ढोबळे  हलगीच्या तालावर झिंगाट नाचू लागले आहेत.. 

..
ajit_pawar
ajit_pawar

मंगळवेढा: विरोधकांना सत्तेच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत पैलवान नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. पैलवान नाही म्हणणाय्रासाठी हा पंढरपूरचा पैलवान (भारत भालके) तयार असून घुटण्या डावावरच चितपट करून दाखवू असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

राष्ट्रवादीचे उमेदवार आ.भारत भालके यांच्या प्रचारासाठी आठवडा बाजारात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी बळीराम साठे, उमेश पाटील, राजूबापू पाटील, दिलीप धोत्रे, चंद्रकांत घुले, तानाजी काकडे,राहुल सावंजी, दादा टाकणे, संकेत खटके,सचिन शिंदे, चंकी खवतोडे, रामचंद्र वाकडे, अनिता नागणे,  सुरेश कोळेकर, लतीफ तांबोळी, पांडूरंग चौगुले , पी.बी.पाटील,भारत बेदरे, मुझ्झमील काझी, प्रज्वल शिंदे  आदी उपस्थित होते. 

श्री पवार  म्हणाले की, ज्या मुद्द्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीची संबंध नाही हे मुद्दे प्रचारात आणले जात आहेत परंतु त्यांच्या सत्तेच्या जोरामुळे त्यांना शेतकऱ्यांचे हित समजले नसल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी उध्वस्त केला आहे .तरुणांना नोकऱ्या देऊ शकले नाहीत. उद्योगधंदे करू शकले नाहीत .सत्तेचा कारभार न करणारे व कधीच माहीत नसणारे सध्या सत्तेत आल्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे हित साध्य करता आले नाही. 

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा समाचार घेत जे हलगीच्या तालावर झिंगाट नाचू लागले आहेत जे पवार साहेबांना सोडून गेले ते तुम्हाला कधीही सोडू शकतील . जे राष्ट्रवादी संपू म्हणणारे स्वतः संपतील पण राष्ट्रवादी संपणार नाही. राष्ट्रवादी पक्ष हा पवारांचा विचार जपणारा पक्ष असून आज जे सोडून गेले तरी देखील राष्ट्रवादी संपली नाही. 

नवीन रक्ताचे तरुण कार्यकर्ते पवार साहेबांच्या सोबत आहेत म्हणून पवार साहेब वयाच्या 79 वर्षी देखील महाराष्ट्रभर दौरे काढून शेतकऱ्यांच्या  भल्यासाठी फिरत आहेत. आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या या 5 वर्षाच्या कारभाराची  तुलना केल्यास सरकारच्या काळात शेतकऱ्याला  संपावर जाण्याची वेळ आली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना निकष लावून अडचणीत आणले . कर्जमाफी कशी द्यायची हे शरद पवारांकडून  विचारून शिका असा  सल्ला अजित पवारांनी यावेळी दिला . 

45 वर्षात नसणारी बेकारी या सरकारच्या सत्तेच्या काळात  आली. शेततळ्याला पन्नास हजार शेततळ्यास अनुदान दिल्याचे सांगतात पण त्या रकमेत शौचालयाचे खड्डा देखील होत नाही. पिकविम्याचे पैसे दिले नाहीत, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com