`ते विजय शिवतारे तर लय टिवटिव करायचं!`

शिवतारे यांच्यावर दादांचा पुन्हा निशाणा!
`ते विजय शिवतारे तर लय टिवटिव करायचं!`

मुंबई : ते विजय शिवतारे तर लय टिवटिव करायचं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची खिल्ली उडविली.

पवार यांनी निवड झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला. पक्षाचे उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून आल्याचे सांगत निलेश लंके, अशोक पवार यांच्यासारखे चेहरेही चांगल्या मताधिक्याने निवडून आले. मी स्वतः बारामतीतून इतक्या मताधिक्याने निवडून येईल, असे वाटत नव्हते. माझ्याशिवाय जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनीही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.``

आपल्या पक्षाच्या कामगिरीचा काॅंग्रेसलाही उपयोग झाला. ते विजय शिवतारे तर लय टिवटिव करायचं, असे दादांनी उच्चारताच सभागृहात हशा उडाला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळीच शिवतारे यांना परत आमदार होऊ देणार नाही, असा निर्धार अजित पवारांनी केला होता. त्यानुसार पुरंदरमध्ये शिवतारे यांचा पराभव झाला. त्यानंतर आजही परत अजितदादांनी शिवतारेंवर निशाणा साधला.  

राष्ट्रवादीच्या बैठकीला विजयी उमेदवार येत असताना मुंबईतील कार्यालयाबाहेर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. तुतारी वाजवल्यानंतर औक्षण केले गेले. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

भाजप विधिमंडळाच्या नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदारांची बैठक उद्या होणार आहे. भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीनेही गटनेत्याची निवड केली आहे. या पदासाठी ज्येष्ठ नेते जयंत पाटील आजितदादा, धनंजय मुंडे यांची नावे चर्चेत होते. मात्र सर्वानी दादांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्ताविक करून पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. भाजपच्या फोडाफोडी राजकारणावर पाटील यांनी जोरदार प्रहार केला. पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पवारसाहेबांनी रात्रीचा दिवस एक केल्याचेही ते म्हणाले. 

पक्षाचे गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करावी असा प्रस्ताव मी मांडत आहे तो एकमताने मान्य करावा अशी विनंती त्यांनी बैठकीत केली. यावेळी नवाब मलिक आणि धनंजय मुंडे आदींनी यांनी अनुमोदन दिले. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विधानसभेतील उमेदवारांची प्रचारासाठी एकच मागणी असायची. ती म्हणजे दोन अमोलपैकी एका अमोलची आम्हाला सभा द्या, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे आणि वक्ते अमोल मिटकरी यांचे कौतुक केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com