हर्षवर्धन यांनी 19 वर्षे मंत्री असताना काय दिवे लावले? : अजित पवार यांचा सवाल

हर्षवर्धन यांनी 19 वर्षे मंत्री असताना काय दिवे लावले? : अजित पवार यांचा सवाल

बावडा : इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यातील सहकारी संस्थांची स्थिती नाजूक आहे.  इंदापूर सहकारी व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. दुधगंगा संस्थेची गटार झाल आहे. इंदापूर अर्बन बँकेची स्थिती नाजूक आहे. दोन्ही कारखान्यांच्या चौकशी ससेमिरा( लचांड)  मागे लागू नये म्हणून भाजपात प्रवेश केला आहे. १९ वर्ष मंत्री असताना काय दिवे लावले, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

जनतेची कामे केली असती तर आज घर ना घर धुंडायची वेळच आली नसती . नुसती जाहिरातबाजी करून स्टाईल मारून चालत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी आजवर चार-पाच घरे बदलली असल्याची कडवी टीका  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली.

बावडा (ता.इंदापूर)  येथे राष्ट्रवादी कॉग्रेस व मित्र पक्षाचे  उमेदवार आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते.

पवार यांनी सांगितले की आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असून मागील पंधरा वर्षात विकास झाला नसल्याची जाहीर कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री 
 व जलसंपदामंत्री असताना पाण्याचे योग्य नियोजन करून इंदापूरला पाणी देत होतो. त्यामुळे पाणी कमी पडत नव्हते. मात्र भाजप सत्तेत आल्यावर नियोजनशून्य कारभार सुरु केला. गिरीश महाजनांनी इंदापूर,बारामतीचे पाणी पाणी बंद केले. व आता महाजन व फडणवीस येथे येऊन पाणी देण्याचे आश्वासन देत आहेत.

शेतकऱ्यांनी दोघांचे काही ऐकू नका. भाजपवाले इंदापूरचा पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाही. इंदापूरात  काहीजण जिल्हा बॅंकेचे मालक असल्यासारखं वागत आहेत. बँकेत शेतकऱ्यांची अडवणूक करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार घडत आहेत. एकाही शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही. हा अजित पवारांचा शब्द असल्याचे सांगून  इंदापूर तालुक्यातील स्वार्थी लोकांच्या भूलथापांना बळी न पडता आमदार दत्तात्रेय भरणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

विजयसिंह मोहिते पाटलांवर टीकेची झोड

अजित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उडवली. पवार यांनी सांगितले की, नदी पलीकडच्या नेत्यांनी पतसंस्थांचे वाटोळे केले. सभासदांचे पैसे दिले नाहीत. जिल्हा बँकेची दयनीय अवस्था केली. सदाशिवनगर साखर कारखाना बंद पाडला. कुक्कुट पालनाची तीच परिस्थिती. विजय शुगरच वाटोळे केले. तर शंकररत्न विकावाच लागला आहे. या सर्व प्रकारावर पांघरून घालण्यासाठी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com