पुणे जिल्हा परिषदेसाठी अजितदादा शिरुर व बारामतीचा मेळ बसविणार?

पुणे जिल्हा परिषदेसाठी अजित पवार इच्छुकांच्या मुलाखती घेणार....
ajit pawar to take decision on pune zp president
ajit pawar to take decision on pune zp president

शिक्रापूर :  शिरुर, बारामती व मावळ लोकसभा मतदारसंघांना न्याय मिळेल असा मेळ घालून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि इतर समिती पदाधिका-यांच्या निवडी निश्चित केल्या जाणार आहेत.

अर्थात राज्यात महाआघाडीचे सूत्र असले तरी ज्या ठिकाणी पूर्ण बहुमत आहे तिथे त्याच पक्षाने स्वतंत्र निर्णय घेण्याचे पूर्णाधिकार महाआघाडीच्या तिनही प्रमुख पक्षांचे झाल्याने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला जिल्हा परिषदेत काहीही मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची खांदेपालट रद्द करुन रमेश थोरात आणि अर्चना घारे यांना अनुक्रमे बॅंकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष म्हणून पूर्ण पाच वर्षांची संधी देण्याचा पक्षाचा निर्णय सर्व प्रमुख पदाधिका-यांना कळविण्यात आला असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

विश्वास देवकाते (बारामती) व विवेक वळसे-पाटील (शिरुर) अशा दोन्ही लोकसभा मतदार संघांचा मेळ घालून जिल्हा परिषदेच्या पहिल्या टर्मसाठी अध्यक्ष-उपाध्यक्षपदांचे वाटप झाले होते. पर्यायाने खुल्या गटातील महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदासाठी यावेळी बारामतीचा दावा नसणार हे नक्की. याच पार्श्वभूमीवर आता शिरुर व बारामती असेच सूत्र लागू होणार हे नक्की होतानाच मावळसाठीही कार्यकर्त्यांचा आग्रह शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांमधील महिलांसाठी अडचणीचा ठरु शकतो हे नक्की.

राष्ट्रवादीकडील २५ महिला सदस्यांपैकी १५ जणींचा दावा अध्यक्षपदासाठी आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत उपमुख्यमंत्री अजित पवार व जेष्ठ नेत दिलीप वळसे-पाटील हे दोघेच निर्णय घेणार हेही पक्षाचे ठरलेले आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते दोन्ही लोकसभा मतदारसंघाची खांदेपालट करुन अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी आपापल्या लोकसभा मतदार संघातील महिला सदस्यांना संधी देतील असा होरा बहुतांश पक्ष पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे मावळच्या पक्षकार्यकर्त्यांची समजुत घालण्यात पक्षश्रेष्ठी यशस्वी झाल्यास शिरुरची महिला अध्यक्ष होण्याची केवळ औपचारीकता शिल्लक राहणार आहे.

कारण विचारु नका, कुणी सांगणारही नाही...!
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची खांदेपालट सन २०१५ च्या बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पहिल्या सव्वा वर्षानंतर लगेच करण्याचे ठरले होते. मात्र बॅंकेच्या शताब्दी वर्षामुळे अडीच वर्षे दोन्हीही पदे दोघांकडे कायम ठेवली गेली ती अध्यक्ष रमेश थोरातांच्या आग्रहामुळे. मात्र त्यानंतर खांदेपालट का केली नाही याची अनेक उलटसुलट कारणे बॅंक संचालक खाजगीत सांगत आहेत. खेड-आंबेगाव व जुन्नर तालुक्यात स्पष्टपणे बोलण्यास प्रसिध्द असलेल्या एका जेष्ठ संचालकांनी तर नाव न छापण्याच्या अटीवर छातीठोक पणे सांगितले की, आमच्या बॅंकेच्या खांदा पालटीची कारणे तुम्ही कुणाला विचारु नका, कारण ती तुम्हाला कुणीच सांगणार नाही. त्यामुळे अध्यक्ष रमेश थोरात तर; उपाध्यक्ष अर्चना घारे हे दोघेही पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com