Ajit Pawar says he felt sad, when Padmasingh Patil left the party | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप उदयनराजे भोसले 14000 मतांनी पिछाडीवर
नांदेड - भोकर मधून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे 779 मतांनी आघाडीवर
मुक्ताईनगर : चौथी फेरी भाजपच्या रोहिणी खडसें 929 ने पुढे
भोसरी - महेश लांडगे 4 हजार 387 मतांनी आघाडीवर
माहीम मतदार संघ शिवसेना सदा सरवणकर 5000 मतांनी आघाडी
चौथ्या फेरीअखेर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 25552 मताने आघाडीवर
चंद्रपूर जिल्ह्यात भाजप ला धक्का..सुधीर मुनगंटीवार वगळता भाजप चे सर्व उमेदवार पिछाडीवर...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

पदमसिंह पाटलांनी साथ सोडल्याचे दुःख मोठे : अजित पवार 

सरकारनामा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

..

मुंबई : डॉ. पद्मसिंह पाटील यांनी साथ सोडल्याचे दुःख मोठे आहे ,असे अजित पवार यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर देताना सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांना असा प्रश्‍न विचारण्यात आला की, विजयसिंह मोहिते पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, छत्रपती उदयनराजे आदी नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून गेले. यांपैकी कोणत्या नेत्याच्या जाण्याने आपल्याला अधिक दुःख झाले?

त्यावर उत्तर देताना श्री. पवार म्हणाले, " विजयसिंह मोहिते पाटील हे पवार साहेबां बरोबर आधीपासून नव्हते. उदयनराजे सुद्धा आधीपासून बरोबर नव्हते. डॉ. पद्मसिंह पाटील मात्र पुलोदच्या काळापासून शरद पवारसाहेबां बरोबर होते. कॉंग्रेस (एस) च्या दिवसापासून ते सोबत होते. ते शरद पवारसाहेबांचे निष्ठावंत होते. 1991 मध्ये कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी शरद पवारसाहेबांच्या विरुद्ध बंड केले त्यावेळीही डॉक्‍टरसाहेबांनी पवारसाहेबांची साथ सोडली नाही.''

ते पुढे म्हणाले, " पवारसाहेबांना दिल्लीला जावे लागल्याने त्यांच्या जागी मुख्यमंत्री कोण असावा हे ठरवण्यासाठी कॉंग्रेस आमदारांचे मतदान झाले. आमदारांची इच्छा होती डॉ. पद्मसिंहांकडे नेतृत्व द्यावे पण तेव्हा साहेबांनी सुधाकरराव नाईकांचे नाव सुचवले. त्यावेळीही पद्मसिंह पाटीलसाहेबांच्या बरोबरच राहिले होते. त्यामुळे ते सोडून गेल्याचे दुःख अधिक आहे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख