ajit pawar satara tour | Sarkarnama

अजितदादा कुणाला शब्द देणार? उदयनराजेंवर काय बोलणार? 

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 25 मार्च 2017

नव्याने निवडून आलेल्यांचा सत्कार उद्या (रविवारी) दुपारी तीन वाजता कल्याण रिसॉर्ट येथे अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. तसेच ते काही खासगी
कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत. 

सातारा : नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सत्काराच्या निमित्ताने रविवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात येत आहेत. जिल्हा
परिषदेच्या विविध विषय समिती सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्यांनी या दौऱ्यात पवारांशी संपर्क साधून आपले नाव निश्‍चित होण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
त्यामुळे ते कोणाला पदाचा शब्द देणार याविषयी उत्सुकता आहे. 

अजित पवारांचा सातारा दौरा यावेळेस अनेक कारणांनी गाजणार आहे. पहिला मुद्दा खासदार उदयनराजेंवर दाखल झालेला खंडणीचा गुन्हा आणि त्यावर अजित
पवार कोणते भाष्य करणार ?. तर दुसरा मुद्दा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान, अनेकांनी भाजपमध्ये उड्या घेतल्या. अशा कार्यकर्त्यांवर ते काय बोलणार
तसेच नवनियुक्त सदस्यांचा सत्कार आणि पदासाठी इच्छुक असलेल्यांकडून होणारी विनवणी या सर्वांना ते कोणता सल्ला देणार याचीच उत्सुकता आहे. अजित पवार
साताऱ्यात आले आणि त्यांनी कोणावर खोचक टीका केली नाही, असे होणार नाही. यात खासदार उदयनराजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार
गोरे यांच्याविषयी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख