अजित पवारांची खंत ,पुण्यातून  थोडी साथ मिळाली असती तर ......

शरद पवार यांच्यासारखा झंझावात कॉंग्रेसच्या नेत्यांनी उभा केला असता तर आताचे चित्र आणखी वेगळे असते, असेही पवार यांनी सांगितले.
ajit_pawar
ajit_pawar

पुणे : विधानसभा निवडणुकीत धनकवडीकरांनी थोडी साथ दिली असती तर पुण्यातून तिसरा आमदार विधानसभेवर गेला असता अशी भूमिका मांडत खडकवासल्यातील पराभवाबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारखा झंझावात कॉंग्रेसच्या नेत्यांनी उभा केला असता तर आताचे चित्र आणखी वेगळे असते, असेही पवार यांनी सांगितले.

पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भूमिका मांडली. पुण्यात खडवासला मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचा केवळ दोन हजार शंभर मतांनी पराभव झाला. धनकवडी तसेत अन्य भागातून आणखी थोडी मदत झाली असती तर पुण्यातून तिसरा आमदार निवडून आला असता असे सांगत हा निसटता पराभव कार्यकर्त्यांना बोचणारा आहे, असे त्यांनी सांगितले.


 या मतदारसंघात यावेळी दोडके यांना चांगले वातावरण निर्माण झाले होते. दोडके निवडून येणार असे वातावरण होते. मात्र, काही कार्यकर्त्यांच्या नाराजीतून केवळ हा पराभव झाल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. या संदर्भ देत पवार यांनी या पुढच्या सर्व निवडणुका सक्षमपणे व झालेल्या चुका सुधारून लढवण्याचे संकेत दिले. 


दरम्यान, येत्या महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीच्या माध्यमातून लढण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यासाठी आवश्‍यक बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिका तसेच ग्रामपंचायत सरपंचपदाची थेट निवड अडचणीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com