राज ठाकरेंसोबत एकत्र सभा घेणार का? : अजित पवार म्हणाले विचार करू

राज ठाकरेंसोबत एकत्र सभा घेणार का? : अजित पवार म्हणाले विचार करू

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यासोबत एकत्रित सभा घेण्यास तयारी दाखवली आहे. राज ठाकरे हे आजच्या सभेत काय आवाहन करतात आणि वेळेच कसं नियोजन ठरत त्यावर यावर विचार करू, असेही अजितदादांनी सांगितले.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनसेला कोथरूडमध्ये का पाठिंबा दिला, याची कारणमीमांसा केली. ते म्हणाले,  ``आम्ही काॅंग्रेससोबत आघाडीबरोबर आहोत. भाजपसेनेविरोधात मतविभाजनाचा फटका बसू नये तेथे वेगळी भूमिका घेतली आहे. कोथरुड त्यापैकीच आहे. तेथे मनसेला पाठिंबा दिला आहे. आजच्या सभेत राज काय आवाहन करतात ते बघू. गरज पडली तर एकत्रित सभा घेतां येतात का, त्यावर विचार करू.  

माझे अश्रू हे कशाचे आहेत हे पाहण्यापेक्षा युती कशी टिकलं हे उद्धव ठाकरे यांनी पाहावं, असा सल्ला त्यांनी दिला. शिवसेना पाच वर्षे झोपली होती का? आता दहा रूपयांत जेवण आणि कर्जमाफीच्या घोषणा करताय. मी कसा आहे, ते लोकांना माहिती आहे. माझे अश्रू मगरीचे आहेत की कशाचे हे तापासायच काम उद्धव ठाकरे कधीपासून करायला लागले?  हे सरकार शेतकरीविरोधी आहे. हे मी कायम सांगत आलोय. आता कांद्याला पैसे मिळायला लागले तर लगेच निर्यातबंदी केली, अशी टीका त्यांनी केली.

या सरकारने पाच वर्षांत काय केले, ते सांगाव. ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा हा काही महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधित नाही. इथे बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांसारखे अनेक प्रश्न असताना हे जातीयवाद उफाळतो. त्यावर सत्ताधारी बोलत नाहीत, असा आक्षेप त्यांनी घेतला. सुप्रिया सुळेंना डेंग्यू झाला होता म्हणून त्या सुरवातीच्या टप्प्या आल्या नव्हत्या. आता त्या प्रचारात सक्रिय होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

सुशीलकुमार शिंदे यांच दोन्ही काॅग्रेसच्या विलीनिकरणाबाबातच मत वैयक्तिक आहे. ती त्यांची इच्छा आहे. ते काॅंग्रेस चे मोठे नेते आहेत. पण आता निवडणुकीला सामोर जाताना कुठलाही संभ्रम नको. राष्ट्रवादीच अस्तित्व वेगळ आहे, अजितदादांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com