अजितदादांनी धावत धावत जावून 'सिल्वर ओक'चा दरवाजा लावून घेतला!

'सिल्वर ओक'मध्ये अर्ध्या तासापासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहे.
अजितदादांनी धावत धावत जावून 'सिल्वर ओक'चा दरवाजा लावून घेतला!

पुणे: चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानी दाखल झाले आहेत.

अजित पवार यांनी चार दिवसांपुर्वी धक्कातंत्र अवलंबत पक्षाला अंधारात ठेवून भाजपशी हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा देत स्वत: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड केल्याची प्रतिक्रिया उमटली होती. शरद पवार यांनी अजित पवारांच्या निर्णयाशी संबंध नसल्याचे जाहीर करूनही अजित पवार आपली भुमिका बदलायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांच्या संपर्कांतील आमदार पक्षाशी जोडून घेण्याचे काम सुरू होते. दोन दिवसांत 54 पैकी 51 आमदार पक्षाबरोबर आले. अजित पवार यांच्याबरोबर आमदार न राहिल्याने फडणवीस सरकारला स्पष्ट पराभव दिसत होता. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी भाजपची साथ सोडावी यासाठी राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यातच आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याने सर्व समीकरणे बदलून गेली. त्यामुळे आज दुपारीच अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. त्यानंतर फडणवीस यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला.

फडणवीस सरकार कोसळल्यानंतर शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीची संयुक्त बैठक झाली. त्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील, असे जाहीर करण्यात आले. या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांना पक्षाने बरोबर घ्यावे, अशी मागणी केली. त्यावेळी अजितदादांच्या जयजयकाराच्या घोषणाही झाल्या. ही बैठक संपल्यानंतरच अजित पवार तातडीने शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. अजित पवार 'सिल्वर ओक'च्या दिशेने निघाले असताना मिडीया त्यांना फॉलो करत होता. हे लक्षात येताच अजित पवार यांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि पळत पळत  'सिल्वर ओक' गाठले. आत शिरताच त्यांनी दरवाजाही लावून घेतला. त्यामुले पुढील व्हिज्युअल्स मिळू शकले नाही. 

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून राजीनामा देईपर्यंत अजित पवार मिडीयाला सामोरे गेलेले नाहीत. आजही त्यांनी मिडीयाचा ससेमिरा चुकवण्यासाठी थेट घराचा दरवाजा लावून घेण्याची शक्कल लढवली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com