ajit pawar, raj purohit, mumbai | Sarkarnama

पुरोहित, तुला शेतीतलं काय कळतं का ?

मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई : आम्ही नियम 97 अन्वये कर्जमाफीच्या चर्चेची मागणी केली आहे तो आमचा हक्क नाही का ? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. त्यावर बसल्या जागेवरूनच सतत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी "नाही" असे प्रतिउत्तर पवार यांना दिले. त्यावर संतापलेले अजित पवार पुरोहित यांच्यावर कडाडले, " तुला शेतीतलं काही कळतं का ?" शेतकऱ्यांचा अपमान करता काय ? " असा खडा सवाल केला. 

विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तरे रद्द करुन नियम अन्वये चर्चेची केली मागणी. त्यावर अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे गटनेते अजित पवार चांगलेच संतापले. 
विधानसभेत आज कामकाजाला सुरवात होताच कर्जमाफीच्या चर्चेवरून चांगलाच गदारोळ झाला. चर्चेची मागणी करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, आम्ही 97 अन्वये कर्जमाफीच्या चर्चेची मागणी केली आहे, तो आमचा हक्क नाही का ? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. त्यावर बसल्या जागेवरूनच सतत खाणाखुणा करणारे भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी "नाही" असे प्रतिउत्तर अजित पवार यांना दिले. त्यावर संतापलेले अजित पवार पुरोहित यांच्यावर कडाडले, " तुला शेतीतलं काही कळतं का ?" शेतकऱ्यांचा अपमान करता काय ? " यावर राज पुरोहित बापट यांची बाजू सावरत संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी 'सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने कर्जमाफीचा निर्णय महत्वाचाच आहे. त्या विषयाला न्याय मिळेल' असे सांगून मध्यस्थी केली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख