ajit pawar question on cm | Sarkarnama

एक मंत्री म्हणतात मी एक मिनिटात सही करीन, मग मुख्यमंत्री करीत नाहीत का? : अजित पवार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

मुंबई : मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत मंत्रिमंडळातील मंत्री वेगवेगळी वक्तव्य करीत आहेत. माझ्याकडे फाइल आली की, मी एका मिनिटात सही करीन असे एक मंत्री म्हणतात. याचा अर्थ मुख्यमंत्री सही करीत नाहीत का? असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांशी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, आपल्या मंत्रिमंडळातील काही मंत्री बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत. पंढरपूरच्या यात्रेत साप सोडण्याबाबत एका मंत्र्याने केलेले व्यक्तव्य चुकीचे आहे. मंत्र्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये.'' 

"आमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. अशा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयात आम्ही राजकारण करू इच्छित नाही. मात्र सरकारने आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांविरुद्ध लावण्यात आलेली 307, 353 अशी कलमे तातडीने काढावीत. हे गुन्हे मागे घेतले नाहीतर या युवकांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत.'' असे अजित पवार म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख