इंदापूरच्या प्रगतीसाठी भरणेच हवेत : अजित पवार

इंदापूरच्या प्रगतीसाठी भरणेच हवेत : अजित पवार

वालचंदनगर : वीजनिर्मिती करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असून मुळशीच्या धरणाचे पाण्याचा उपयोग प्राधान्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी करण्यात येईल. पाणीप्रश्‍न व इंदापूर तालुक्यासह राज्याच्या प्रगतीसाठी आमदार  दत्तात्रेय भरणे यांना विजयी करण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते.यावेळी आमदार भरणे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पवार यांनी सांगितले की, सध्या  वाऱ्यापासुन, सुर्यापासून , बग्यास जाळून, अणूउर्जा , थर्मल पॉवरपासुन  वीजनिर्मिती करण्यात येत आहे. सध्या मुळशीच्या धरणाचे पाणी टाटा विजनिर्मितीसाठी वापरत आहे. धरणाचे पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व शेतीसाठी करणे गरजेचे असून मुळशीचे पाणी पुण्यासाठी वळविले जाईल. व खडकवासला धरण साखळीतील पाणी  इंदापूर ,दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी  व शेतीसाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले जाईल. भाजप-सेनेच्या धोरणामुळे राज्यातील शेतकरी,उद्योजक व सर्वसामान्य नागरिक अडचणीमध्ये आला आहे.  अनेक कारखाने बंद पडल्या असून कामगारांच्या नोकरी गेल्या आहेत.

भाजप-सेना  सरकारने राज्यावरती ५ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डाेंगर केला आहे. १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.शेतकऱ्यांची कर्जमाफी तीन-चार वर्षापासून सुरु आहे. राज्यामध्ये बेकारीचे प्रमाण वाढले असून अनेक नागरिकांना उपाशी राहावे लागत आहे. नोटाबंदी,जीएसटीमुळे देशाचे नुकसान झाले असून अनेकांच्या नोकरीवरती गदा आली. मोदी सरकार मंदीला जबाबदार असल्याचे खुद्द अर्थमंत्र्यच्या पतीने म्हटले आहे. निवडणूक राज्याची असून पंतप्रधान प्रचारसभेला येत असून यापूर्वीचे पंतप्रधान राज्याच्या निवडणूकीमध्ये सहभागी होत नसल्याचे सांगितले.  


शिवसेनच्या जाहिरनाम्याची उडवली खिल्ली...
 शिवसेनेने १ रुपयामध्ये आरोग्य तपासणी, १० रुपयामध्ये पोटभर जेवन देण्याचे आश्‍वासनाची अजित पवार यांनी खिल्ली उडवली. तसेच शेतकऱ्यांना १२ तास दिवसा वीज देण्याचे आश्‍वासन दिले असून पाच वर्षे भाजप-सेनेचे सरकार असताना शेतकऱ्यांना  का  वीज दिली नाही ?  हे सरकार खोटे आश्‍वासने देत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

इंदापूरच्या नेत्यांचे काय होणार ? 
राज्यातील खडसे, तावडे, बावनकुळे या मंत्र्यांची भाजपने काय अवस्था केली आहे. हे सगळ्यांना माहित आहे. मात्र तरीही इंदापूरातील नेते भाजपमध्ये गेले आहेत.त्यांची काय अवस्था होईल असे पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com