जे मुलाला निवडून आणू शकत नाही, तर इतरांचे काय होईल, बारणेंचा अजितदादांना टोला 

जे मुलाला निवडून आणू शकत नाही, तर इतरांचे काय होईल, बारणेंचा अजितदादांना टोला 

पिंपरीःअजित पवार हे स्वताच्या मुलाला लोकसभेला निवडून आणू शकले नाहीत. तर, विधानसभेला त्यांच्या उमेदवारांची स्थिती काय होईल अशी बोचरी टीका मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केली. शहरात दोन ठिकाणी त्यांना उमेदवारही मिळू शकला नाही, एवढी त्यांची अवस्था वाईट आहे,असा टोला त्यांनी लगावला. 

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले पालिकेतील पक्षाचे गटनेते राहूल कलाटे यांच्यावर कारवाईचा निर्णय दोन दिवसांत होईल,असे बारणे यांनी सांगितले.कलाटेंसारख्यांची बंडखोरी हे अतिउत्साही कार्यकर्त्यांचे धाडस असल्याची संभावना त्यांनी केली. 

भाजप सुद्धा आपल्या बंडखोरांवर अशीच कारवाई करेल,असे सांगणाऱ्या बारणेंचा रोख भाजपच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांच्या दर्यापूरमधील (अमरावती)बंडाच्या दिशेने होता. महायुतीच्या शहरातील पहिल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते

. भाजपचे खासदार शहरातील तिन्ही आमदार,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पण, बॅटिंग केली बारणेंनीच.चिंचवड व भोसरीत महायुतीच्या उमेदवाराचे लीड किती हाच प्रश्न फक्त बाकी आहे. ते दोघेही लाखाने निवडून येतील. तर,पिंपरीचाही उमेदवार शंभर टक्के विजयी होईल,असे ते म्हणाले.शिवसेना ही शहरात भाजपचे निसंकोचपणे काम करेल, अशी खात्री त्यांनी यावेळी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com