काकांच्या विरोधातील बंडाचा आणखी एक सामना : अजित पवारांचा 15 वर्षांपूर्वीचा प्लॅन प्रत्यक्षात

महाराष्ट्रात काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष नवीन नाही. शरद पवार यांच्याविरोधात जाऊन अजित पवार यांनी भाजपशी संधान साधून उपमुख्यमंत्रिपद घेतले.
काकांच्या विरोधातील बंडाचा आणखी एक सामना : अजित पवारांचा 15 वर्षांपूर्वीचा प्लॅन प्रत्यक्षात

पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित  पवार  यांनी सन 2004 पासून आवरलेली बंडाची तलवार अखेर 2019 मध्ये उपसलीच. पक्ष नेतृत्त्वाकडून म्हणजेच शरद पवार यांच्याकडून आपल्या राजकीय कर्तुत्वाला न्याय दिला जात नसल्याची तीव्र भावना अजित पवारांच्या मनात गेल्या 15 वर्षांपासून वेगवेगळ्या निमित्ताने साचली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होऊन अखेरीस आज ती बाहेर पडली.

राष्ट्रवादी कांग्रेसची स्थापना झाल्यापासून एकदा मुख्यमंत्रीपदाची आणि एकदा उपमुख्यमंत्रीपदाची (दोन्ही सन 2004 मध्ये) संधी डावलली गेली. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वत:च्याच मुलाला पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी मिनतवारया कराव्या लागल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना यांच्यात फुट पडल्यानंतर कांग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिघांच्या सरकार स्थापनेचा घोळ सुरु झाला. मात्र या तिघातही सर्वात मोठा पक्ष असून 'राष्ट्रवादी'ला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेण्यासंदर्भातला मुद्दा शरद पवार यांनी साफ झिडकारला.

या पार्श्वभूमीवर व्यथित झालेल्या अजित पवारांनी अखेरीस बंडाचा झेंडा फडकवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अजितदादांच्या या  निर्णयाची खबर शेवटपर्यंत शरद  पवार  यांना लागू दिली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र शरद पवार यांच्या आजवरच्या प्रतिमेमुळे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, असे मत 'राष्ट्रवादी'तूनच व्यक्त होत आहे. शिवाय याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद  पवार  यांनी घेतलेली 45 मिनिटांची भेट याचीही पार्श्वभूमी आहे.

अजित पवारांची भूमिका वैयक्तिक, राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा नाही : शरद पवार 

 भाजप सोबत सत्तेत जाण्याचा अजित पवार यांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्याचा काही संबंध नाही. राष्ट्रवादीचा त्याला पाठिंबा नाही, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
भाजपने व राष्ट्रवादी सोबतसरकार स्थापन केल्यानंतर शरद पवार यांची काय भूमिका राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीचा अजित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा नाही. सत्तेत जाण्याचा अजित पवार यांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक असून राष्ट्रवादीशी संबंध नाही, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com