अजित पवार मुंबईतच : शरद पवार

अजित पवार हे माझ्याबरोबरच मुंबईत आहेत. काँग्रेस नेत्यांशी आमची चर्चाही सुरू आहे. - जयंत पाटील
अजित पवार मुंबईतच : शरद पवार

मुंबई: अजित पवार हे मुंबईत आहेत. ते उद्या माध्यमांशी बोलतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

टेलिव्हिजन चॅनेल्सवर अजित पवार पुन्हा रागावल्याच्या व बारामतीला गेल्याच्या बातम्या येवू लागल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवार मुंबईतच आहेत. उद्या तुमच्यासमोर येतील. ते चेष्टेने म्हणाले असतील. तुम्ही त्याचा एवढा विषय करू नका. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड असे म्हणाले, अजित पवार एका बैठकीसाठीच गेलेले आहेत. ते कुठे गेले आहेत आणि कुणाशी भेटणार आहेत हे त्यांना सांगायचे नसेल म्हणून त्यांनी बारामती जात असल्याचे सांगितले असेल. त्यांचे ठिकाण सांगितले तर तुम्ही तिथेही गेला असता. सगळ्या गोष्टी मिडीयाला सांगून करायच्या नसतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com