`हा बाबा तर भल्या पहाटे शपथ घेतो...कार्यक्रमाचं विचारूच नका!`

अजित पवारांची अशीही फटकेबाजी भल्या सकाळी हास्य फुलवून गेली...
ajit pawar sahpathvidhi
ajit pawar sahpathvidhi

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रम भल्या सकाळीच सुरू होतात. त्यामुळे कार्यकर्ते, अधिकारी या सर्वांचीच धावपळ होते. त्यांनी ऐन थंडीत आज सकाळी आठ वाजतात नाशिक जिल्ह्यात दिंडोरीतील कादवा येथे कार्यक्रम घेतला.

या सकाळच्या कार्यक्रमावरून स्वतः दादांनीच फटकेबाजी केली. मी सकाळी इतक्या लवकर येईन का, अशी चर्चा होती असे स्वतःच सांगत दादा म्हणाली की एक जण तर असा म्हणत होता की हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो, असे सांगत अजितदादांनी हास्यस्फोट घडवून आणला. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या पहाटे शपथ घेतली होती. त्यामुळे राज्यात मोठे नाट्य उभे राहिले. या प्रसंगाची आठवण दादांनी स्वतःच करून दिली.

माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं, त्यामुळे माफ करा. पण दहा वाजता मला बैठका आहेत. नाशिक, धुळे, जळगा आणि नगर येथे जायचय, असे दादांनी सांगितले.

पेपरमध्ये उलटसुलट बातम्या येत असल्याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले. माझे आणि अशोक चव्हाणांचे वाद सुरु आहेत. छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांचा खुर्चीवरुन वाद झाला, मात्र हे खोटे असल्याचा दावात्यांनी केला. बातम्या येत असल्या तरी लक्षात ठेवा कोणी तरी चावटपणा करत आहे, असेही त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com