ajit pawar maratha reservation press | Sarkarnama

न्याय मिळत नसल्याने मराठा समाज आमच्यावरही नाराज, अजित पवारांची कबुली 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

मुंबई : मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळावे यासाठी सरकारने प्रयत्न करावे यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असे स्पष्ट करतानाच मराठा समाज आमच्यावरही नाराज आहे. मी त्यांची नाराजी समजू शकतो असे स्पष्ट करतानाच केंद्र आणि राज्यातील सरकारने पाऊल उचलण्याची गरज आहे अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षियांची बैठक बोलावली होती. ही बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यात शांततेने मोर्चे काढूनही काही मिळत नसल्याने समाजात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याची गरजही आहे. मराठा समाजावर आमदारांवरही नाराजी व्यक्त करीत आहे. या नाराजीमुळे काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आम्हीही प्रयत्न करण्यास तयार आहोत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठकही बोलाविण्यात आली असून तेथे याबाबत विचारविनीमय करण्यात येणार आहे. 

मराठ्यांबरोबरच मुस्लिम, धनंगर आदी समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका पवार यांनी यावेळी मांडली. राज्य आणि केंद्र सरकारने याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावावे अशी मागणीही सरकारकडे करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख