Ajit Pawar Irritated Due to NCP Aspirants Phones | Sarkarnama

....म्हणून अजित पवार वैतागले 

गजेंद्र बडे  
बुधवार, 11 डिसेंबर 2019

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक आणि त्यांच्या पाठीराखे आमदारांचे फोनही पवार यांना या एकाच विषयावर येऊ लागले आहेत. यामुळे मागील आठवडाभरापासून अजित पवार यांचा दिवसातील सर्वाधिक वेळ हा केवळ झेडपी पदाधिकार्यांसाठी इच्छुक असलेल्यांसोबत चर्चा करण्यातच जाऊ लागला आहे.

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांची पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अक्षरशः रीघ लागली आहे. 

शिवाय इच्छुक आणि त्यांच्या पाठीराखे आमदारांचे फोनही पवार यांना या एकाच विषयावर येऊ लागले आहेत. यामुळे मागील आठवडाभरापासून अजित पवार यांचा दिवसातील सर्वाधिक वेळ हा केवळ झेडपी पदाधिकार्यांसाठी इच्छुक असलेल्यांसोबत चर्चा करण्यातच जाऊ लागला आहे. यामुळे अजित पवार जाम वैतागून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी आता इच्छुकांना त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. 

त्यानुसार, ''अरे बाबांनो, माझ्याकडे येण्यापेक्षा आधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे जा,'' असा सल्ला त्यांनी दिला आहे. शिवाय सर्व जिल्हाध्याक्षांनाही इच्छुकांकडून लेखी अर्ज मागवून घेण्याबाबतची सूचना केली आहे. पवार यांच्या या सुचनेची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बुधवारपासून (ता.११) प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख