`अजित पवारांनी आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट काम केले`

`अजित पवारांना फोडण आणि सरकार स्थापन करणं हा भाजपाचा डाव होता`
sanjay raut attacks ajit pawar
sanjay raut attacks ajit pawar

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसची साथ सोडून आणि पवार साहेबांच्या पाठीत या वयात खंजीर खुपसून अजित पवार यांनी आपल्या आय़ुष्यातील वाईट काम केले आहे, असा घणाघात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला.

राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर घणाघात केला. अजित पवार हे बहुमताचे खोटे कागदपत्रे घेऊन जातात. राज्यपाल त्या आधारे सरकार स्थापन करतात. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला काळा दिवस बोलणाऱ्यांनी स्वतः त्यापेक्षा वाईट आणि काळे कृत्य केले आहे, अशी टीका त्यांनी केली. खोटे बोलण्यात भाजपचा हात कोणी पकडू शकणार नाही. राष्ट्रवादीचे 49 आमदार अजूनही आमच्या सोबत आहेत. आमच्या आमदारानी धमकी दिली जाते. मला धमकी दिली जाते. हा संजय राऊत घाबरणारा नाही. आता हा त्यांचा शेवटचा खेळ आहे. फसविणारा आपल्या खेळातच ते फसेल, असा दावा त्यांनी केला.

अजित पवार हे मोठे नेते नाहीत. त्यांनी आमदारांना फसवून शपथविधीला नेले. अजित पवारांनी आपल्या आयुष्यातील वाईट काम केलं आणि पवार साहेबांच्या पाठीत या वयात खंजीर खुपसला. सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिस आणि ईडी हे चार त्यांचे कार्यकर्ते आहेत. पोलीस आणि राज्यपाल हे राखीव खेळाडू आहेत, अशी टीका त्यांनी केली.

“अजित पवारांना फोडण आणि सरकार स्थापन करणं हा भाजपाचा डाव होता. तो त्यांच्यावर उलटला आहे. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे २५ आमदार येतील आणि बहुमत सिद्ध करता असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिलं. पण, भाजपाकडं बहुमत होतं, त्यांनी काळोखात शपथ का,” असा सवाल संजय राऊत उपस्थित केला.

राऊत म्हणाले, “राज्याचा मुख्यमंत्री शपथ घेतो आणि हे राज्यातील जनतेलाच माहिती होत नाही. हे म्हणजे पाकिट मारणाऱ्या लोकांसारखच आहे. अजित पवारांना फोडणं आणि सरकार स्थापन करणं हा शेवटचा डाव होता. तो भाजपावर उलटला आहे. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे २५ आमदार येतील आणि बहुमत सिद्ध करता येईल असं त्यांना वाटलं, त्यामुळेच भाजपानं त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं. काल सरकार स्थापन केल्यानंतर भाजपानं मोजक्या लोकांना पेढे आणि लाडू भरवले, पण ते त्यांच्या घशाखाली उतरलेले नाहीत,” असा चिमटाही राऊत यांनी भाजपाला काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com