अजित पवारांनी दिले होते राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या सह्यांचे पत्र

देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी सुरु आहे.
Ajit Pawar Had Submitted Fifty Four MLA Signatures to Maharashtra Governor
Ajit Pawar Had Submitted Fifty Four MLA Signatures to Maharashtra Governor

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व म्हणजे ५४ आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना दिल्याचे महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. आपल्याला १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र भाजपने दिल्याचेही सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले. 

देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात  याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नोटीस बजावली आहे. न्या. एन व्ही रमणा, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.

आज महाधिवक्ता तुषार मेहता यांनी राज्यपालांना अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली पत्रे सर्वोच्च न्यायालयाला वाचून दाखवली. 'मी अजित पवार राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाचा नेता आहे. ५४ आमदारांच्या सह्यांचे पत्र. राष्ट्रपती राजवट नको म्हणून भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देत आहोत,' असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच भाजपने १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांना दिलेले पत्रही न्यायालयाला वाचून दाखवले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com