अजित पवारांचा साडेचार वर्षात पहिल्यांदा फोन आला..

अजित पवारांचा साडेचार वर्षात पहिल्यांदा फोन आला..

वालचंदनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या प्रामाणिकपणा व सभ्यपणाचा गैरफायदा घेवून  केवळ उपयोग करुन घेतला असल्याचा आरोप माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.

इंदापूर येथे झालेल्या जनसंकल्प मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले. मी राष्ट्रवादीसाठी पाच वेळा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केल्याचा दावा त्यांनी केला. आजपर्यंत  राष्ट्रवादीने उपयोग करुन घेतला. दगेबाजी, अन्याय,फसवेगिरी खूप काही सहन केले आहे. आत्ता सहन करणार नाही, असा इशारा पाटील यांनी या वेळी दिला.

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी  २०१९ च्या  लोकसभा निवडणूकिपूर्वी दिल्लीमध्ये मला बोलावून घेतले होते. पक्ष व राज्यामध्ये आघाडी अडचणीमध्ये आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे काम करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.  मी त्यांना म्हणालो की आतापर्यंत  चार वेळा फसवले आहे. पाचव्या वेळेसह ही फसवणार आहेत, अशी आठवण पाटील यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे चार महिन्यांपूर्वी घरी भेटायाला आल्यानंतर `भाऊ, शब्दांनी सुरवात करीत होत्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी साडेचार वर्षात पहिल्यांदा अजित पवारांचा फोन आला. आठ दिवस दररोज फोन येत होता. शेवटी तालुक्यामध्ये अजित पवार व मी चार सभा घेतल्या. जनतेचा बेंबीच्या देठापासून राष्ट्रवादीला नकार असताना लोकसभेचे काम प्रामाणिकपणे केले. मात्र काय मिळाले, असा सवाल त्यांनी केला.

जनसंकल्प मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटलांनी पुढे काय करायचे विचारल्यानंतर कार्यकर्त्यांनी भाजप-भाजपच्या घोषणा दिल्या. पाटील यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काैतुक केल्यामुळे पाटील यांचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com