अजितदादांनी आमदारांच्या चालकांनाही खूष करून टाकले

...
ajit pawar
ajit pawar

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांच्या विकास निधीत 1 कोटी रुपयांची वाढ केली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. त्याच पाठोपाठ आता आमदारांच्या चालकालाही दरमहा 15 हजार रुपयांचे वेतन विधिमंडळामार्फत देण्यात येणार आहे.

याबाबत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत प्रस्ताव मांडला असता, सभागृहाने एकमताने सदर प्रस्ताव मंजूर केला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आमदारांचा विकास निधी दोन कोटी वरून तीन कोटींवर नेला आहे. मागील सरकारने आमदारांच्या पीएचा पगार 15 हजारांवरून 25 हजार रुपये केला होता. आता महाविकास आघाडीच्या सरकारने आमदारांच्या चालकाला दरमहा 15 हजार रुपये वेतन देण्याचे ठरविले आहे.

याबात दोन्ही सभागृहात प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. एकूण 289 आमदारांची संख्या असून 288 आमदार राज्यातून निवडून आलेले आहे. तर एक आमदार अँग्लो इंडियन मधून राज्यपाल नियुक्त करतात. मात्र या सरकारने कुठलाही आमदार अद्याप नियुक्त केला नसल्याने 288 आमदार विधानसभेतील तर विधान परिषदेतील ७८ आमदारांच्या चालकाला 15 हजार दरमहा वेतन मिळणार आहे. यामुळे राज्य सरकारवर तब्बल 6 कोटी 60 लाख रुपयांचा वार्षिक आर्थिक ताण येणार आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com