Ajit Pawar to Give Booster Dose to NCP Workers Tomorrow | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

अजितदादा लागले निवडणुकीच्या तयारीला; आढावा बैठकीत उद्या बुस्टर डोस देणार

उत्तम कुटे
रविवार, 30 सप्टेंबर 2018

लोकसभा व कदाचित त्याबरोबर विधानसभा निवडणुक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने राष्ट्वादी काँग्रेस तयारीला लागली आहे. उद्या (ता.1) पक्षाचे नेते पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आढावा बैठक घेणार आहेत.

पिंपरी : लोकसभा व कदाचित त्याबरोबर विधानसभा निवडणुक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने राष्ट्वादी काँग्रेस तयारीला लागली आहे. उद्या (ता.1) पक्षाचे नेते पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आढावा बैठक घेणार आहेत. त्यात ते पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचा आदेश देण्याची शक्यता आहे. त्यासाठी ते त्यांना 'बूस्टर डोस' देत चार्ज करतील, असे समजते. 

पुण्याची बैठक सकाळी 11 वाजता, तर पिंपरीत ती सायंकाळी चार वाजता होणार आहे. पुण्यासह राज्यातील पक्षाचे बहुतांश जिल्हाध्यक्ष निवडले गेले आहेत. अपवाद पिंपरीचा आहे. त्याची तसेच कदाचित या वर्षअखेरीसही होण्याची शक्यता असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचीही चाचपणी ते उद्याच्या बैठकीतून अजितदादा करतील, असा अंदाज आहे. एकूणच त्यांचा भर हा निवडणुक तयारीवर राहणार आहे. आजी- माजी पदाधिकारी, सर्व सेल अध्यक्ष व नगरसेवकांनाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 

ही आढावा बैठक असल्याने तिला अजेंडा नाही, असे पक्षाचे शहर प्रवक्ते फजल शेख यांनी 'सरकारनामा'ला सांगितले .मतदारनोंदणी आणि बूथ कमिट्या सक्षम करण्याचा आढावा अजितदादा यावेळी घेतील, असे ते म्हणाले. फक्त निवडणुकीत तयार असणारे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतील निम्मे हे नंतर ढेपाळत असल्याचा अनुभव असल्याने त्यांना यावेळी 'चार्ज' करण्यात येणार असल्याचे कळते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख