अजित पवार यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

संस्था व व्यक्तींचा सत्कार स्विकारुन अजित पवार यांचा संध्याकाळी साडेपाच वाजता शारदा प्रांगणात स्मृतीचिन्ह देऊन सत्कार होणार आहे.येथील अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आ
Ajit Pawar Felicitation Tomorrow in Baramati
Ajit Pawar Felicitation Tomorrow in Baramati

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरी सत्कारासाठी बारामती सज्ज झाली असून त्यांच्या मिरवणूकीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. 10) शारदा प्रांगणात अजित पवार यांचा सपत्नीक सत्कार होणार असून त्या पूर्वी दुपारी चार वाजता कसब्यातून त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढली जाणार आहे. 

संस्था व व्यक्तींचा सत्कार स्विकारुन अजित पवार यांचा संध्याकाळी साडेपाच वाजता शारदा प्रांगणात स्मृतीचिन्ह देऊन सत्कार होणार आहे. येथील अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या मंडळाची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. या मुळे पवार कुटुंबियांचे या मंडळावर विशेष प्रेम आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहभाग असलेले सरकार सत्तेवर आल्याने तसेच अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याने सर्वांपेक्षा वेगळा सत्कार करण्याची मंडळातील सदस्यांची इच्छा होती. चर्चेअंती सदस्यांनी आपापसात वर्गणी गोळा करून मिरवणूक व सत्कार समारंभावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन केले.  त्या करता आवश्यक असणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या परवानगी घेतल्या असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com